37.6 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeमहाराष्ट्र१२ आमदारांच्या नियुक्तीची सरकारलाच घाई नाही ! -राज्‍यपाल भगतसिंह कोश्यारी

१२ आमदारांच्या नियुक्तीची सरकारलाच घाई नाही ! -राज्‍यपाल भगतसिंह कोश्यारी

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.११ (प्रतिनिधी) राज्‍य सरकारसोबत आपला कुठलाही संघर्ष  नाही. राज्‍य सरकारच्या प्राथमिकता असतात,त्‍यानुसार ते काम करते. पण राज्‍य सरकार आणि राज्‍यपाल असा कोणताही संघर्ष नाही, असे राज्‍यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्‍पष्‍ट केले.कंगना राणावत प्रकरणी मी राज्‍य सरकारकडे नाराजी व्यक्‍त केली या बातम्‍यांतही कोणतेही तथ्‍य नाही.तसेच राज्‍यपालनियुक्‍त १२ आमदारांच्या प्रस्‍तावाची राज्‍य सरकारलाच घाई नाही,  तर त्‍यात माझा काय दोष असा सवालही त्‍यांनी केला.मला मराठी पूर्ण समजते,थोडे बोलताही येते पण येत्‍या वर्षभरात मी निश्चितच अस्‍खलित मराठीतूनच बोलून दाखवेन, असा निर्धारही त्यांनी केला.

राज्‍यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पदाची सूत्रे हाती घेतल्‍याला ५ सप्टेंबर रोजी एक वर्ष पूर्ण झाले.त्‍यानिमित्‍त त्‍यांच्या वर्षभरातील कामगिरीचा लेखाजोखा घेणा-या कॉफीटेबल पुस्‍तकाचे प्रकाशन राजभवन येथे करण्यात आले.त्‍यानिमित्‍त ते पत्रकारांशी बोलत होते.राज्‍यसरकार,मुख्यमंत्री आदी अनेक विषयांवर त्‍यांनी आपली भूमिका स्‍पष्‍ट केली.राज्‍य सरकारसोबत आपला संघर्ष आहे असे मी मानत नसल्‍याचे सांगून राज्‍यपाल भगतसिंह कोश्यारी म्‍हणाले,विदयापीठाच्या अंतिम वर्ष परीक्षांचा विषयही आता निकालात निघाला आहे.कंगना राणावत प्रकरणी मी मुख्यमंत्री कार्यालयाकडे नाराजी व्यक्‍त केली हे मला बातम्‍यांमधूनच समजले.

तसेच राज्‍यपाल नियुक्‍त १२ आमदारांच्या नियुक्‍तीच्या बाबत विचारले असता राज्‍यपालांनी हिंदीतील ‘मुददई सुस्‍त,गवाह चुस्‍त’ ही म्‍हण ऐकवून दाखवली.म्‍हणजेच ज्‍याचे काम आहे त्‍यालाच घाई नाही तर मला का त्‍याचा दोष देता असा त्‍याचा अर्थ होतो.मुख्यमंत्री,राज्‍य सरकार यांच्या अधिकारात राज्‍यपाल हस्‍तक्षेप करतात असा आक्षेप दरम्‍यानच्या काळात घेण्यात आला होता.त्‍याबाबत राज्‍यपाल म्‍हणाले,मी कोणाच्याही कामात हस्‍तक्षेप करत नाही.कोणी सल्‍ला विचारला तरच देतो.महाविकास आघाडी सरकारच्या आधी जो भल्‍या पहाटे शपथविधी झाला होता त्‍यावरूनही गदारोळ झाला होता.त्‍याबाबत राज्‍यपाल म्‍हणाले,आपण पहाटेला रामप्रहराची वेळ म्‍हणतो.त्‍यावेळी जर कोणी शपथ घेतली तर त्‍यावर प्रहार का करायचा.

शेतक-यांचा आक्रोश थांबवला
राज्‍यात दरम्‍यानच्या काळात राष्‍ट्रपती राजवट लागू होती.म्‍हणजेच राजयाचा संपूर्ण कारभार राज्‍यपालांच्या हाती होता.त्‍यावेळची आठवण सांगताना राज्‍यपाल म्‍हणाले,राष्‍ट्रपती राजवट लागूच नये.पण त्‍यावेळी राज्‍यातील शेतकरी अडचणीत होता.मी प्रशासकीय अधिका-यांना सांगितले की आपल्‍याला शेतक-याला मदत करायची आहे.सुरूवातीला पैशांची अडचण सांगण्यात आली.मात्र मी ठाम राहिलो.अधिका-यांना सांगितले की दुपारपर्यंत माझया हातात सहीसाठी ऑर्डर घेउनच या.तेव्हा मी आठ हजार कोटी रूपये मंजूर केले.हेक्‍टरी शेतक-यांना आठ हजार रूपये मिळाले.दोन दिवसांत ही रक्‍कम शेतक-याच्या हातात पडलीच पाहिजे असे मी बजावले व शेतक-याचा आक्रोश थांबविला असेही राज्‍यपाल म्‍हणाले.

मी वर्षभरातच अस्‍खलित मराठीत बोलेन
राज्‍यपाल भगतसिंह कोश्यारी हे विधिमंडळातील अभिभाषण मराठीतूनच वाचतात.त्‍यांना आता मराठी समजते देखील.त्‍यावर विचारले असता राज्‍यपाल म्‍हणाले,मला आता मराठी चांगल्‍या रितीने समजते.थोडे फार मराठी मी आवर्जुन बोलतो.पण येत्‍या वर्षभरात मी अस्‍खलितपणे मराठीतूनच संवाद साधण्याचा निश्चय केला आहे.

राजभवनातील कर्मचा-यांच्या वेतनाचा प्रश्न सोडविला
राज्‍यपाल झाल्‍यानंतर राजभवनातील कर्मचा-यांना नियमानुसार वेतन मिळत नाही हे माझया निदर्शनास आले.इतर सरकारी कर्मचारी,विधिमंडळ कर्मचारी,न्यायालयीन कर्मचारी यांना नियमानुसार वेतन मिळते मग माझयाच कर्मचा-यांना का नाही,त्‍यामुळे मी तातडीने त्‍यांच्या वेतनाचा प्रश्न सोडविला असेही राज्‍यपाल म्‍हणाले.राजभवनातील लायब्ररीकडे वीस वर्षे कोणी लक्षच दिले नव्हते आता ती अत्‍याधुनिक करण्यात येणार आहे.राजभवनातील कर्मचा-यांच्या मुलांनाही लायब्ररी,जीम आदी सुविधा मी उपलब्‍ध करून देणार असल्‍याचे राज्‍यपाल म्‍हणाले.

कोरोनाचा निर्भिडपणे सामना करा
कोरोनाचा खरे तर निर्भिडपणे सामना करायला हवा.मी राजकीय नेत्‍यांना देखील सांगतो की घाबरण्याची खरे तर काहीच गरज नाही.फक्‍त सावधगिरी निश्चितच बाळगली पाहिजे.मला विश्वास आहे की राज्‍य सरकार कोरोनाच्या लढयात निश्चितच यशस्‍वी होईल असेही राज्‍यपाल भगतसिंह कोश्यारी म्‍हणाले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,477FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या