26.5 C
Latur
Sunday, January 17, 2021
Home उस्मानाबाद उस्मानाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ४३० खाटांचे रुग्णालय होणार !

उस्मानाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ४३० खाटांचे रुग्णालय होणार !

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.१३ (प्रतिनिधी ) उस्मानाबाद येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ४३० खाटांचे रुग्णालय सुरु करण्याचा निर्णय आज राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. उस्मानाबाद येथे शासकीय महाविद्यालय व त्याला सलग्न रुग्णालय उभारण्यास आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी एकूण रुपये ६७४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच आवश्यक तेवढी पदनिर्मिती करण्यास आणि पदे भरण्यास देखील आज मान्यता देण्यात आली. नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकरिता राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकांप्रमाणे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारितील जिल्हा सामान्य रुग्णालय, स्त्री रुग्णालय आणि क्षय रुग्णालय स्थावर जंगम मालमत्तेसह तात्पुरत्या स्वरूपात वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागास निशुल्क वापरास उपलब्ध करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय हे वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णालय सार्वजनिक खाजगी भागिदारी (पीपीपी) तत्वावर स्थापन करण्यास तत्वत: मान्यता देण्यात आली आहे.

राज्यात खाजगी कौशल्य विद्यापीठाची स्थापना !
राज्यात कायम स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर खाजगी कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्याबाबतच्या मार्गदर्शक सुचना व मॉडेल विधेयकास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. स्कील इंडियाच्या धर्तीवर ह्ल कुशल महाराष्ट्र- रोजगारयुक्त महाराष्ट्रह्व या संदर्भात ध्येयधोरण निश्चित करतांना राज्यात कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्याच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या कौशल्य विद्यापीठांद्वारे कौशल्य क्षेत्रातील पदवी, पदविका, पदव्युत्तर पदवी, प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबविण्यात येतील. त्याचप्रमाणे उद्योग व सेवा क्षेत्रामध्ये प्रशिक्षण तसेच रोजगार व स्वंयरोजगार क्षेत्रावर विशेष लक्ष देऊन कौशल्य कोर्सेसवर आधारित पदविका व पदवी प्रदान करण्यात येईल.

आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियमात सुधारणा !
आरोग्‍य विज्ञान अभ्यासक्रमाचे नवीन महाविद्यालय सुरू करण्याचे प्रस्ताव महाराष्‍ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठ व शासनास सादर करण्यासाठी सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

सरपंच आणि सदस्यपदाच्या लिलाव : दोन ग्रामपंचायतींची निवडणूक रद्द !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या