मुंबई : रिपब्लिकन टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर राज्यातील राजकारण तापले असून, अर्णब यांची अटक ही लोकशाहीची गळचेपी असल्याचा आरोप होत असताना राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही या वादात उडी घेतली आहे. राज्यपाल यांनी आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत फोनवरून याबाबत चर्चा केली आहे.
अन्वय नाईक आणि त्यांच्या आई कुमुद यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अर्णब गोस्वामी यांना मागील बुधवारी सकाळी रायगड पोलिस आणि मुंबई पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत अटक केली होती. या पार्श्वभूमीवर राज्यपलांनी अनिल देशमुख यांच्याकडे अर्णब गोस्वामी यांची सुरक्षा व आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
गोस्वामी बुधवारी ४ नोव्हेंबरपासून अटकेत आहेत. रविवारी त्यांना नवी मुंबईतील तळोजा कारागृहात हलवण्यात आले आहे. त्यामुळे अर्णब गोस्वामी यांच्या कुटुंबियांना त्यांना भेटू देण्याची तसेच त्यांच्याशी बोलण्याची अनुमती द्यावी, अशा सूचनाही राज्यपालांनी गृहमंत्र्यांनी दिल्या आहेत. यापूर्वीही राज्यपालांनी अनिल देशमुख यांच्याकडे गोस्वामी यांच्या अटकेच्या पद्धतीवरून चिंता व्यक्त केली होती.
नाडियादवालांच्या पत्नीला ड्रग्ज कनेक्शनवरून अटक