24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeमहाराष्ट्रराम शिंदेंकडून पहाटेच अहिल्यादेवी होळकरांना अभिवादन

राम शिंदेंकडून पहाटेच अहिल्यादेवी होळकरांना अभिवादन

एकमत ऑनलाईन

अहमदनगर : भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांनी पहाटेच अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज २९७ वी जयंती आहे. या जयंतीदिनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पण या कार्यक्रमावर टीका करत राम शिंदे यांनी पहाटेच सहकुटुंब चौंडीतील अहिल्येश्वर मंदिरात जाऊन पूजा केली.

अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकात जाऊन अहिल्यादेवींना अभिवादन केले. यावर्षी शिंदे चौंडीतील कार्यक्रमात सहभागी न होता मुंबईत कार्यक्रम घेणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उत्सव सुरू होण्यापूर्वीच शिंदे यांनी पहाटेच अभिवादन केले. दरम्यान, राम शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या कार्यक्रमावर टीका केली आहे.

या जयंतीदिनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावर भाजप नेते राम शिंदे यांनी जहरी टीका केली आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीला पक्षीय स्वरूप देण्यात आले असून राष्ट्रवादीने याला मेळाव्याचे स्वरूप दिले आहे, अशी टीका राम शिंदेंकडून करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून घेण्यात आलेल्या कार्यक्रमामुळे अहिल्यादेवी होळकर यांच्या भक्तांची कुचंबणा झाली असल्याचे राम शिंदे यांनी म्हटले आहे. रोहित पवार यांनी अहिल्यादेवी होळकर जयंतीला राजकीय स्वरूप दिल्याने वादग्रस्त आणि संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली असल्याचे राम शिंदे यांनी म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या