25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रमाईक उगारणा-या महंतांचा सत्कार

माईक उगारणा-या महंतांचा सत्कार

एकमत ऑनलाईन

नाशिक : नाशिकच्या अंजनेरी हनुमान जन्मस्थळाबाबतचा वाद अद्यापही कायम आहे. गोविदानंद आपल्या भूमिकेवर ठाम राहून गुजरातला रवाना झाले. यानंतर आज अंजनेरीच्या साधू- महंतांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी शास्त्रार्थ सभेत माईक उगारणा-या महंतांचा सत्कार करण्यात आला.

गेल्या आठ दिवसांपासून कर्नाटक येथील किष्किंधाचे गोविंदानंद महाराज यांनी हनुमान जन्मस्थान हे अंजनेरी नसून किष्किंधा नगरी असल्याचा दावा केला. यानंतर हा वाद चांगलाच पेटला. हनुमान जन्मस्थळ वादावर तोडगा काढण्यासाठी शास्त्रार्थ सभेचे आयोजनही करण्यात आले.

मात्र शास्त्रार्थ सभेची सुरुवात वादाने झाली आणि शेवटही वादानेच झाला. यामुळे तीन ते चार तास चाललेल्या या वादातून काहीही निष्पन्न झाले नाही. शिवाय पोलिसांना या वादात मध्यस्थी करावी लागली.

दरम्यान शास्त्रार्थ सभेतून हनुमान जन्मस्थळाचा वाद मिटला तर नाहीच शिवाय गोविंदानंद महाराजांनी पत्रकार परिषद घेत किष्किंधा हेच अंजनेरी जन्मस्थान असल्याच्या भूमिकेवर ठाम राहिले. यावेळी त्यांनी नाशिककरांना किष्किंधा नगरीत दर्शनासाठी येण्याचे निमंत्रण देत ते गुजरातला रवाना झाले. यानंतर आज नाशिक-त्र्यंबकेश्वरचे साधू-महंत विचारमंथनासाठी एकत्र आले असून अंजनेरीत बैठक घेण्यात आली.

यावेळी शास्त्रार्थ सभेत गोविंदानंद महाराज यांच्यावर माईक उगारणा-या महंतांचा सत्कार देखील करण्यात आला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या