24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeमहाराष्ट्रशपथविधीसाठी मार्गदर्शक तत्त्वे ठरवून द्यायला हवीत

शपथविधीसाठी मार्गदर्शक तत्त्वे ठरवून द्यायला हवीत

एकमत ऑनलाईन

राज्यपालांचे उपराष्ट्रपती, लोकसभा अध्यक्षांना पत्र

मुंबई : नव्याने निवडून आलेले खासदार, संसदेचे सदस्य तसेच विधानमंडळाचे सदस्य यांच्या शपथविधीसाठी मार्गदर्शक तत्त्वे ठरवून द्या, अशी मागणी करणारे पत्र उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना महाराष्ट्राचे राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांनी लिहिले आहे. दोन दिवसांपूर्वीच राज्यसभेत भाजपा नेते उदयनराजे भोसलेंनी खासदारकीची शपथ घेतल्यावर जय भवानी, जय शिवाजी या घोषणा दिल्या. त्यानंतर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजेंना समज दिली. या सगळ््या घटनेनंतर शिवप्रेमींनी संतप्त भावना व्यक्त केल्या. अशा घटना भविष्यात घडू नये, यासाठी राज्यपालांनी व्यंकय्या नायडू आणि ओम बिर्ला यांना पत्र लिहिले आहे.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना स्वतंत्र पत्र पाठवून राज्यपालांनी शपथ ग्रहण विधीचे पावित्र्य व गांभीर्य जतन करण्यासाठी अशा प्रकारच्या मार्गदर्शक तत्त्वांची गरज असल्याचे नमूद केले. आपल्या आवडत्या पक्ष नेत्यांचे अथवा आपली श्रद्धा व निष्ठा आहे, अशा आराध्य व्यक्तींचे नाव शपथेच्या प्रारुपात जोडल्याने शपथविधी प्रक्रियेचे गांभीर्य कमी होते, असे कोश्यारी यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

महाराष्ट्रातही मंत्रिपदाची शपथ घेताना काही सदस्याना आपण शपथ लिहिली आहे, त्याच स्वरुपात कोणतीही नावे न जोडता पुन्हा वाचण्याची सूचना राज्यपालांनी केली होती. त्याचेही स्मरण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या पत्रामध्ये केले आहे. शपथेच्या प्रारुपानुसार फारकत घेण्यासंदर्भातील या विषयावर आपला विचार विनिमय करून सर्व संबंधितांना सूचना आणि मार्गदर्शक तत्त्वे लागू करावीत, असे राज्यपालांनी म्हटले आहे.

Read More  रश्मी ठाकरेंच्या रक्षकाला कोरोना

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या