24.8 C
Latur
Saturday, November 27, 2021
Homeमहाराष्ट्र१९ जुलै रोजी गटारी : विचारला जातोय हा प्रश्न

१९ जुलै रोजी गटारी : विचारला जातोय हा प्रश्न

एकमत ऑनलाईन

पुणे : श्रावण महिना कधी सुरू होणार याची उत्सुक्ता महिलां ऐवजी पुरूषांनाच जास्त असते. ते वारंवार श्रावण कधी लागणार याची माहिती घेत असतात. कारण श्रावण लागला की दारू, मटन सर्व काही बंद होते. त्यामुळे गटारीच्या दिवशीच जल्लोष साजरा करण्याकडे त्यांचा कल असतो. राज्यात गटारी म्हटलं की जोरदार साजरी होत असते. श्रावण महिना सुरू होणार असल्यामुळे मद्यपींसाठी आणि नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी गटारी ही खास असते. पण यंदा राज्यावर कोरोनाचं संकट आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी संपूर्ण राज्यात अजूनही लॉकडाऊन आहे. अशात गटारीला नॉन व्हेज खाणाऱ्यांची मोठी गर्दी असते. त्यामुळे गटारीच्या दिवशी मटण दिवसभर मिळणार का? असा प्रश्न विचारला जात असून सोशल मिडियावर त्याबद्दल जोरदार चर्चा रंगली आहे.

19 जुलैला मटण विक्रीच्या वेळेत वाढ करुन देण्यात यावीअशी मागणी

आषाढी आमावस्या अर्थात गटारीला 19 जुलैला मटण विक्रीच्या वेळेत वाढ करुन देण्यात यावी, अशी मागणी पुणे मटण दुकानदार असोसिएशन आणि अखिल भारतीय खाटीक समाजाने केली आहे. येत्या 21 जुलैपासून श्रावण महिना सुरु होत आहे. 20 जुलैला सोमवती आमावस्या आहे. त्यामुळे 19 जुलैला रविवार येत असून आषाढ आमवस्येला मटण विक्री मोठ्या प्रमाणात होते.

या सगळ्याचा विचार करत त्या दिवशी मटण विक्रीच्या वेळेत वाढ करण्याची मागणी

या सगळ्याचा विचार करत त्या दिवशी मटण विक्रीच्या वेळेत वाढ करण्याची मागणी अखिल भारतीय खाटीक समाज पुणे अध्यक्ष सिद्धेश कांबळे यांनी केली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून देशात लॉकडाऊन आहे. सध्या राज्यात अनलॉकची घोषणा केली. मात्र, पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे पुण्यात पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला.

मटण दुकानदार आर्थिक अडचणीत

लॉकडाऊनमुळे मटण दुकानदार आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे रविवारी (19 जुलै) मटण दुकानदारांचे आर्थिक नुकसान भरुन निघणार आहे. प्रशासनाने रविवारी मटण विक्रीसाठी 8 ते 12 ही वेळ निश्चित केली आहे. ही वेळ वाढवून द्यावी अशी मागणी मटण विक्री करणाऱ्या दुकानदारांनी केली आहे. यासंदर्भात पुणे मटण दुकानदार असोसिएशन आणि अखिल भारतीय खाटीक समाजाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जिल्हा प्रशासनाला निवेदनही देण्यात आल्याची माहिती सिद्धेश कांबळे यांनी दिली आहे.

Read More  दिलासा : लस ऑगस्ट महिन्यात बाजारात येणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या