22.7 C
Latur
Wednesday, April 14, 2021
Homeमहाराष्ट्रअर्ध्या तासात अहवाल : लवकरच उपलब्ध होणार १ लाख ॲन्टीजेन टेस्टींग कीट

अर्ध्या तासात अहवाल : लवकरच उपलब्ध होणार १ लाख ॲन्टीजेन टेस्टींग कीट

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत असताना त्याला आळा घालण्यासाठी पालिकेतर्फे होत असलेल्या प्रयत्नानाही यश येत आहे. संसर्ग रोखण्यासाठी आता कोणतीही कसर न ठेवता आणखी आक्रमकरित्या उपाययोजना करण्यात येत आहेत. महानगरपालिकेने आता ‘मिशन युनिव्हर्सल टेस्टिंग’ हाती घेतले आहे. अवघ्या अर्ध्या तासात कोरोना चाचणीचा अहवाल देणाऱ्या अँटीजेन टेस्टिंगच्या एक लाख कीट खरेदी करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे.

महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या उपस्थितीत विविध अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये महानगरपालिका आयुक्त श्री. चहल यांनी विविध निर्देश दिले आहेत. राज्य शासनाने परवानगी दिलेल्या एसडी बायोसेन्सर कंपनीच्या कीटद्वारे ॲन्टीजेन टेस्टींग करण्यात येणार आहे. या चाचणीचा परिणाम हा १५ ते ३० मिनिटांच्या आत प्राप्त होत असल्याने बाधित रुग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य होणार आहे.

महानगरपालिकेने ॲन्टीजेन कीटच्या १ लाख कीट खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. हे कीट मुंबईतील महानगरपालिकेची सर्व रुग्णालये, शासन रुग्णालये तसेच कोरोना उपचार केंद्र आदी ठिकाणी उपयोगात आणण्यात येणार आहेत. दरम्यान, मुंबई महापालिका क्षेत्रातील ३५ मोठ्या खासगी रुग्णालयांनीदेखील या शासनमान्य ॲन्टीजेन टेस्ट कीट खरेदी कराव्यात आणि त्याचा उपयोग करावा, असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

Read More  केंद्र सरकारचा मोठा निर्णय : सहकारी बँका आता आरबीआयच्या कक्षेत येणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,474FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या