28.2 C
Latur
Sunday, July 3, 2022
Homeमहाराष्ट्रबाहुलीला फाशी देत स्वत: घेतला गळफास; पुण्यात ८ वर्षांच्या मुलाचे कृत्य

बाहुलीला फाशी देत स्वत: घेतला गळफास; पुण्यात ८ वर्षांच्या मुलाचे कृत्य

एकमत ऑनलाईन

पुणे : पुण्याच्या पिंपरी-चिंचवडमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका आठ वर्षांच्या मुलाने खेळण्यातील बाहुलीला फाशी दिली. बाहुलीला फाशी देण्याआधी त्याने तिच्या तोंडाला कपडा बांधला. यानंतर स्वत:च्या तोंडाला कपडा बांधून लटकवून घेतले. थेरगावमध्ये हा प्रकार समोर आला आहे.

संबंधित कुटुंबीय नेपाळी असून ते एका सोसायटीतील पार्किंगमध्ये वास्तव्यास आहे. त्यांना तीन मुलं असून आठ वर्षांचा मुलगा सर्वांत मोठा आहे. वडील याच सोसायटीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात.
मोबाईलमधील व्हीडीओ पाहून मुलाने हे कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांना आहे. ही घटना घडली त्या वेळी मुलाची आई घरातच होती. दुर्घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

संबंधित आठ वर्षांचा मुलगा घरात बाहुलीसोबत खेळत होता. त्याची आई कामात व्यग्र होती. मुलगा खेळत असल्यामुळे आईने कामं उरकून घेण्याला प्राधान्य दिले. मात्र बराच वेळ आवाज येत नसल्याने आईने पाहिले असता भूषण (बदललेलं नाव) खिडकीला लटकलेला होता आणि बाहुलीला टॉवेलने लटकवले होते. मुलाने घरातील कपडे वाळत घालण्याच्या दोरीने गळफास घेतला.

मोबाईल व्हीडीओचे वेड
पुण्यात दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. भूषण मोबाईवर व्हीडीओ बघत होता. त्याला हॉरर चित्रपट पाहण्याची सवय असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. त्यातून खेळत असताना त्याने बाहुलीला फाशी दिली. पोलिस पंचनाम्यासाठी आल्यानंतर त्यांना बाहुलीच्या तोंडावर कपडा बांधल्याचे दिसले. तसेच टॉवेलच्या सहाय्याने या बाहुलीला फाशी देण्यात आली होती.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या