22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांकडून राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुख्यमंत्र्यांकडून राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.१७ (प्रतिनिधी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राजभवनावर जाऊन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. विधानपरिषदेच्या नियुक्त्या रोखल्यामुळे राजभवन व सरकारमधील दरी वाढलेली असताना, गेल्या वर्षी राज्यपालांना ट्विटरवरुन शुभेच्छा देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी यंदा प्रत्यक्ष भेट घेऊन शुभेच्छा दिल्याने कटुता कमी होणार का हे बघावे लागेल.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज थेट राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासमवेत मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, शिवसेना पक्ष सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.

दिल्लीत।पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची झालेली भेट, आज राज्यपालांची भेट, यामुळे शिवसेना-भाजपातील कटुता प्रयत्न सुरू असल्याची कुजबुज वाढली आहे. परंतु राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत व त्यांच्या वयाचा, राजकीय अनुभवाचा आम्हाला आदरच आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे स्वाभाविक आहे. त्यातून वेगळे अर्थ काढण्याची गरज नाही, असे संजय राऊत यांनी सांगितले.

सातशे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी जैन संघटनेने स्वीकारली

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या