23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeमहाराष्ट्रहर घर तिरंगाला प्रतिसाद, राज्यात सर्वत्र पदयात्रा

हर घर तिरंगाला प्रतिसाद, राज्यात सर्वत्र पदयात्रा

एकमत ऑनलाईन

मुंबई : भारताला स्वातंत्र्य मिळून यंदा ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त देशभरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा उत्साह पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आजपासून हर घर तिरंगा अभियान सुरू केले. या अभियानाअंतर्गत प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्याचे आवाहन करण्यात आले. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाला राज्यात आज पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला.

हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत आज राज्यातील शहर आणि गाव, वाड्यांतदेखील घरोघरी तिरंगा ध्वज फडवण्यात आला. मुंबईत मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी परिसरात आज भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. ३२० फूट लांब आणि नऊ फूट रुंद आकाराचा तिरंगा हे या पदयात्रेचे मुख्य आकर्षण होते. पुणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूरसह अन्य शहरांतही पदयात्रा काढण्यात आली. तसेच तालुका स्तरावरदेखील तिरंगा ध्वजासह पदयात्रा आयोजित केल्या होत्या. मराठवाड्यातील औरंगाबादसह नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, उस्मानाबाद, जालना या आठही जिल्ह्यात हर घर तिरंगा आणि त्यानिमित्त पदयात्रांना चांगला प्रतिसाद मिळाला.

बीड जिल्ह्यातील परळीत १५० फूट उंच तिरंगा ध्वजाचे लोकार्पण करण्यात आले. परळी नगर परिषदेच्या माध्यमातून वैद्यनाथ कॉलेजच्या पाठीमागील डोंगरावर हा ध्वज आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या स्फूर्तीस्थळाचे लोकार्पण माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. जालना जिल्ह्यातील मंठा येथे ५०१ फुटी विक्रमी तिरंगा रॅली काढण्यात आली. याशिवाय धुळ््यातील जमीयत उलेमा हिंद यांच्या वतीने शहरातून तिरंगा रॅली काढण्यात आली. आमदार फारुक शाह यांच्या नेतृत्वात काढलेल्या रॅलीत मुस्लिम बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तसेच मालेगावमध्येही आज भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.

अमृत महोत्सवानिमित्त तीन दिवस कार्यक्रम
केंद्र सरकारकडून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी आजपासून हर घर तिरंगा अभियानाला सुरुवात करण्यात आली. १३ ऑगस्टपासून १५ ऑगस्टपर्यंत प्रत्येक घरावर देशाचा राष्ट्रध्वज फडकवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या