27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमहाराष्ट्रकांदा न खाल्ल्याने कोणी मेला आहे का? : खोत बरसले

कांदा न खाल्ल्याने कोणी मेला आहे का? : खोत बरसले

एकमत ऑनलाईन

नाशिक : निर्यात बंदी, नैसर्गिक संकट आणि इतर कारणांमुळे नेहमी कांदा उत्पादक शेतकरी संकटात राहिला आहे. ऊस उत्पादक शेतक-याप्रमाणे कांदा उत्पादक शेतक-यांना राजाश्रय मिळाला नाही.

त्यामुळे निफाड तालुक्यात होणा-या आजच्या कांदा परिषदेच्या माध्यमातून एक धोरण ठरवून ते राज्य आणि केंद्र सरकारकडे देणार असल्याचे रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले. तर कांदा न खाल्ल्याने कोणी मेला आहे का? आजपर्यंत तरी मी ऐकलं नाही, असा घणाघातही सदाभाऊ खोत यांनी यावेळी केला.

रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत हे कांदा परिषद प्रसंगी आज नाशिक दौ-यावर आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर कडाडून टीका केली. यावेळी ते म्हणाले की, कधी कांदा रडवतोय कर कधी कांदा हसवतोय. कारण कांदा उत्पादक शेतक-यांपुढे कधी निर्यात बंदी तर कधी नैसर्गिक संकट उभे राहिल्याने तर कधी इतर कारणामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

अशातच नाशिक जिल्ह्यासह राज्यात ऊस अधिक आहे. मात्र ऊस उत्पादक शेतक-यांप्रमाणे कांदा उत्पादक शेतक-यांना राजाश्रय मिळाला नाही. त्यामुळे आजच्या निफाड येथील कांदा परिषदेच्या माध्यमातून कांद्यासंदर्भात एक धोरण ठरवून ते राज्य आणि केंद्र सरकारकडे देणार असून या धोरणावर विचार नाही झाला तर मग आरपारची लढाई लढणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.

ते पुढे म्हणाले की, जीवनावश्यक वस्तूंमध्ये कांदा टाकण्यात आला आहे. कांदा न खाल्ल्याने कोणी मेला आहे का? आजपर्यंत मी तरी ऐकलं नाही. तुम्ही तरी सांगू शकता का? त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंमधून कांदा वगळावा अशी आमची मागणी आहे. ही मागणी राज्य सरकारने केंद्राकडे मांडावी असे सदाभाऊ खोत यांनी येथे नमूद केले. दरम्यान राज्य सरकार हे करणार नाही कारण हे सरकार फक्त लोणी खाण्यात व्यस्त आहे अशी टीका देखील खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या