33.9 C
Latur
Tuesday, March 9, 2021
Home महाराष्ट्र पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात 'तो' व्हिडीओ झाला लीक

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात ‘तो’ व्हिडीओ झाला लीक

एकमत ऑनलाईन

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण सध्या राज्यभर चर्चेत आहे. या प्रकरणावरून शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचे नाव जोडले जात आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राठोड यांनी पुढे येत त्यांच्यावर झालेल्या आरोपांवर स्पष्टीकरण देताना सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मागील आठवड्यात सोशल माध्यमांवर या प्रकरणाशी संबंधित काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. अशातच या प्रकरणाशी निगडीत एक व्हिडीओ लीक झाल्याची माहिती समोर येत आहे.

जो व्हिडीओ लीक झाला आहे त्यामध्ये संजय राठोड यांचा फोटो असून, तुझपे ही तो मेरा हक है, हे गाणे व्हिडीओमध्ये वाजताना दिसत आहे. महत्वाचे म्हणजे हा लीक झालेला व्हिडीओ पूजा चव्हाणच्या लॅपटॉपमधील असून तिने हा व्हिडीओ संजय राठोड यांच्यासाठी बनवला असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र या व्हिडीओबाबतची सत्यता अद्याप तपासण्यात आलेली नाही.

ज्या दिवशी ही घटना घडली म्हणजे ८ फेब्रुवारीला पुण्यात पूजाने आत्महत्या केली त्या दिवशी भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्याने हा व्हिडीओ या प्रकरणातील महत्वाचा दुवा असलेल्या अरूण राठोडकडून मिळवला असल्याची माहिती समजत आहे. याआधी एक दोन नाही तर तब्बल १२ ऑडिओ क्लिप्स बाहेर आल्या होत्या. यावरून विरोधी पक्षाने संजय राठोड यांच्यावर पूजाच्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा थेट आरोप केला होता.

दरम्यान, संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर होत असलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यासोबतच मी एवढच सांगतो की मला आता या प्रकरणावर काही बोलायचे नसून जे काही सत्य आहे ते चौकशीतून बाहेर येईल, असे संजय राठोड म्हणाले होते.

विद्यार्थ्यांनी मानले गुरूजनांचे ३५ वर्षांनंतर ऋण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,445FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या