मुंबई : राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी आज राज्याच्या गृहमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी सध्याचा काळ कठीण असून, प्रशासकीय कामात कोणताही हस्तक्षेप न करता मला देण्यात आलेली जबाबदारी उत्तमरित्या पार पाडण्याचा प्रयत्न करेन, अशी ग्वाही दिली. यासोबतच पोलिस अधिका-यांच्या राजकीय निष्ठाही तपासल्या जातील, असे सांगत राजकीय निष्ठा बाळगणा-या पोलिस अधिका-यांबाबत सूचक विधान केले.
राज्याच्या गृहमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पोलिस दलात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित अधिकारी असून, ते निष्ठा बाळगून काम करीत असल्याबाबत वळसे पाटील यांना विचारण्यात आले, त्यावेळी त्यांनी कुणाची निष्ठा काय आहे, कुणावर आहे, हे येत्या काळात तपासून पाहिले जाईल. योग्य ती माहिती घेतली जाईल आणि त्यावर निर्णय घेतला जाईल, असे म्हटले. सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. स्वच्छ प्रशासन आणि प्रशासनात माझा कुठलाही राजकीय हस्तक्षेप असणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गृहमंत्रिपदाचा पदभार देण्यात आला. आज दुपारी वळसे पाटील यांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला असून ते लगेचच कामाला लागले आहेत. पत्रकारांशी बोलताना वळसे पाटलांनी आपली भूमिका स्पष्ट केली. कोविड काळात सर्व पोलिस रस्त्यावर उतरले आहेत. या जबादारी बरोबर ते कायदा सुव्यवस्थादेखील सांभाळत आहेत. सर्व धर्मियांचे सण याच महिन्यात मोठ्या प्रमाणात आहेत. आमच्याकडून सर्वसामान्य जनता, महिला यांना मोठ्या आशा आहेत. पण सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.
स्वच्छ प्रशासनावर भर
आजी-माजी अधिकारी यांचा सल्ला घेतला जाईल. स्वच्छ प्रशासन हा माझा प्रयत्न राहील. प्रशासनात माझा कुठला राजकीय हस्तक्षेप असणार नाही. प्रस्थापित शक्ती कायदा, पोलिस सक्षमीकरण, कायदा सुव्यवस्था हे प्राधान्य दैनंदिन ब्रिफिंगसाठी स्वतंत्र यंत्रणा असणार आहे, असेही वळसे पाटलांनी सांगितले. चौकशीबाबत सीबीआयला सहकार्य केले जाईल, असेही ते म्हणाले.
पुण्यात कोरोनाची स्थिती हाताबाहेर?