36.1 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeमहाराष्ट्रराज्यात महिलांसाठी फिरता दवाखाना आरोग्यमंत्री राजेश टोपेंची घोषणा

राज्यात महिलांसाठी फिरता दवाखाना आरोग्यमंत्री राजेश टोपेंची घोषणा

एकमत ऑनलाईन

मुंबई : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. मुंबईसह राज्यात महिलांसाठी आता फिरता दवाखाना दिसेल, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात आयोजित जनता दरबारात आरोग्य योजनांबद्दल ते बोलत होते. फिरत्या दवाखान्याचे उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येईल, असे टोपे म्हणाले. महिलांना घरातून रुग्णालयात आणणे, त्यांना त्यांच्या घरी सुरक्षित सोडणे यासाठी या फिरत्या दवाखान्याची सुविधा असणार आहे, असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे. ग्रामीण भागात प्रत्येक जिल्ह्याला दोन-दोन फिरते दवाखाने असणार आहेत. ग्रामीण भागासह मुंबईमध्ये या फिरत्या दवाखान्यांची अधिक वाढ केली जाणार आहे. याचा चांगला परिणाम होईल, असे राजेश टोपेंनी सांगितले.

हा दवाखाना अत्याधुनिक आणि अद्ययावत असेल. तसेच नॅशनल हेल्थ मिशनच्या माध्यमातून ही सेवा सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे राज्याच्या ग्रामीण भागातही फिरत्या दवाखान्याची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या फिरत्या दवाखान्यात टेस्टिंग, लॅब, ८१ प्रकारची औषधे, ४० प्रकारच्या टेस्ट, सोनोग्राफी व महिलांची प्रसूतीही केली जाऊ शकते. गरोदर महिलांना रुग्णालयात आणणे, त्यांना त्यांच्या घरी सुरक्षित पोहोचवणे यासाठी फिरता दवाखाना अतिशय उपयुक्त ठरेल. प्रत्येक जिल्ह्याला दोन-दोन फिरते दवाखाने असणार आहेत. ग्रामीण भागासह मुंबईमध्ये अधिक वाढ केली जाणार असून याचा चांगला परिणाम होईल असेही राजेश टोपे यांनी सांगितले.

कोरोना रिकव्हरी रेट ९५.३७ टक्के
दरम्यान, राज्यात कोविड-१९ चा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी संकट कायम आहे. कालच्या अपडेटनुसार, राज्यात काल १,९२७ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून ४,०११ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत तब्बल १९,३६,३०५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ४१,५८६ सक्रिय रुग्ण असून रिकव्हरी रेट ९५.३७ टक्के इतका झाला आहे. विशेष म्हणजे राज्यातही कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे.

मुंडे पुन्हा अडचणीत? करुणा शर्मा यांनी केली पोलिसांत तक्रार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
167FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या