30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeमहाराष्ट्रमंदिरांबाबत दिवाळीनंतरच निर्णय आरोग्यमंत्री टोपे

मंदिरांबाबत दिवाळीनंतरच निर्णय आरोग्यमंत्री टोपे

एकमत ऑनलाईन

कल्याण : सर्वसामान्यांसाठी रेल्वे सेवा व मंदिरे उघडण्याचा निर्णय दिवाळीनंतर घेतला जाऊ शकतो, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. या दोन्ही गोष्टीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेतील असेही टोपे यांनी सांगितले. कल्याणमध्ये राष्ट्रवादी पक्षाची बैठक व महापालिका हद्दीतील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री टोपे आले होते. बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली.

एसओपीबाबत टास्क फोर्सकडून काम सुरु
दिवाळीनंतर कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रेल्वे सेवा सुरु करण्याचा व मंदिरे उघडण्याचा निर्णय हा दिवाळीनंतरच घेतला जाऊ शकतो. सोशल डिस्टन्सिंग कसे पाळले जाईल. त्यासाठी एसओपी तयार करावी लागेल. टास्क फोर्सने त्यावर काम सुरु केले आहे याकडेही टोपे यांनी लक्ष वेधले. पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची चर्चा आहे. याविषयी टोपे यांच्याकडे विचारणा केली असता हा संपूर्ण निर्णय पक्षश्रेष्ठींचा आहे, असे त्यांनी सांगितले.

‘गूगल पे’भोवती सीसीआयचा फास

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या