22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeमहाराष्ट्रआरोग्यमंत्र्यांचे ‘मिशन कवच कुंडल’?

आरोग्यमंत्र्यांचे ‘मिशन कवच कुंडल’?

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्यात आल्या असून ७ ऑक्टोबरपासून मंदिरे देखील उघडण्यात आली आहेत. अशातच आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी मिशन कवच कुंडल योजनेची घोषणा केली आहे.

८ ऑक्टोबर २०२१ ते १४ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत ‘मिशन कवच कुंडल’ ही योजना राबवायची असून या योजनेचे उद्दिष्ट देशात १५ ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच दस-याच्या दिवसापर्यंत १०० कोटी नागरिकांचे लसीकरण व्हावे असे केंद्र सरकारचे टार्गेट असल्याचे राजेश टोपेंंनी सांगितले आहे. लसीकरणानंतर कोविड होणार नाहीच, असे नाही मात्र दसरा आणि दिवाळी या सणादरम्यान त्याचा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पूर्वी लस उपलब्ध नव्हती मात्र आता तशी परिस्थिती नसल्याने किमान १५ लाख लसीकरण दररोज झाले पाहिजे, असे राजेश टोपेंनी म्हटले आहे. तसेच आता आपल्याकडे ७५ लाख लसींचे डोस उपलब्ध आहेत, २५ लाख आणखी उपलब्ध होतील आणि अशाप्रकारे १ कोटी लस या क्षणाला उपलब्ध आहेत, त्यामुळे सहा दिवसांत हा स्टॉक पूर्ण संपवण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाला आम्ही दिले आहे, असेही आरोग्यमंत्र्यांनी म्हटले.

रस्त्यावर राहणारे लोक, भिकारी अशा प्रकारच्या कोणत्याच व्यक्ती कोरोनाविरोधी लसीकरणापासून वंचित राहू नयेत, असे राज्य सरकारचे उदिष्ट आहे. अनेकदा बेघर लोकांकडे कोणतेच ओळखपत्र नसते. अशावेळी हे लोक वंचित राहू नयेत म्हणूनच कोविन अ‍ॅपमध्ये अशा प्रकारचे विशेष मॉड्युल आहे. ज्यामध्ये ओळखपत्राशिवायही लस देण्यासाठीची तरतूद आहे.

काहीच ओळख नसली तरीही अशा व्यक्तींचा लसीकरण मोहिमेत समावेश करण्याची तरतूद आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. अनेकदा नेटवर्कचा प्रॉब्लेम, सर्व्हर किंवा कनेक्टिव्हिटीचा प्राॉब्लेम असतो. त्यामुळे लसीकरण मोहिमेत ऑफ लाईन पद्धतीचाही समावेश करा अशाही सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.

७५ तास सलग लसीकरण
पिंपरी-चिंचवड महापालिकेने नावीन्यपूर्ण संकल्पनेच्या माध्यमातून ७५ तास सलग लसीकरण सुरू ठेवले. दिवस-रात्री कधीही आपल्या सोयीनुसार लसीकरणाची सुविधा या पुढाकाराअंतर्गत देण्यात आली होती. त्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांसोबतच ट्रान्सजेंडर, सेक्स वर्कर्स यांनाही प्राधान्याने या लसीकरण मोहिमेत सहभागी करून घेण्याची कामगिरी या पुढाकाराअंतर्गत करण्यात आली आहे. कोणताही घटक उपेक्षित राहू नये.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या