22.5 C
Latur
Wednesday, December 8, 2021
Homeमहाराष्ट्रजामीन अर्जाची सुनावणी तहकूब आर्यनच्या नशिबी प्रतीक्षा कायम

जामीन अर्जाची सुनावणी तहकूब आर्यनच्या नशिबी प्रतीक्षा कायम

एकमत ऑनलाईन

मुंबई : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जावरील उर्वरित सुनावणी आता २७ ऑक्टोबरला होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने पुढील सुनावणी बुधवारी दुपारी अडीच वाजता निश्चित केली आहे. आर्यनचे वकील मुकुल रोहतगी यांनी कोर्टात आपली बाजू मांडली. त्यांच्यानंतर अमित देसाई अरबाज मर्चंटच्या जामिनाच्या बाजूने युक्तिवाद करत होते. अमित देसाई यांनी ४५ मिनिटे उत्तर दिले तर एनसीबीच्या वतीने अनिल सिंग यांनी ४५ मिनिटे सांगितले. त्यावर न्यायालयाने पुढील सुनावणी उद्यापर्यंत तहकूब केली. त्यामुळे जामिनासाठी आर्यनच्या नशिबी प्रतिक्षाच कायम राहिली.

आर्यन खानच्या वकिलांनी मुंबई हायकोर्टात शपथपत्र दाखल केले असून आर्यनचा प्रभाकर साईल किंवा किरण गोसावी यांच्याशी कोणताही संबंध नसल्याचे न्यायालयाला सांगितले. समीर वानखेडे आणि इतर यांच्यात सुरू असलेल्या आरोपांशी अर्जदाराचा काहीही संबंध नाही, असे शपथपत्रात नमूद करण्यात आले आहे. प्रभाकर साईलचे प्रतिज्ञापत्र प्रसारित करणारी माध्यमे दाखवत आहेत की आर्यन खान तपास रुळावर आणण्याचा प्रयत्न करत आहे, असे एनसीबीने म्हटले आहे. मात्र आर्यन खानने आपल्या लेखी प्रतिज्ञापत्रात एनसीबीचे आरोप नाकारले आहेत.

आर्यन खानची अटक बेकायदेशीर : रोहतगी
आर्यनचे वकील मुकुल रोहतगी म्हणाले की, आर्यन तिथे फक्त पाहुणे म्हणून गेला होता. आर्यन खानकडून कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज जप्त करण्यात आलेले नाहीत. त्याची कोणतीही वैद्यकीय चाचणीही झालेली नाही. ज्या साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले, ते विरोधी झाले आहेत. आर्यनला प्रतीक गाबा यांनी विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. क्रूझमध्ये चढण्यापूर्वी आर्यनला ताब्यात घेण्यात आले. ही केस फक्त सहा ग्रॅमची होती. म्हणजे लहान प्रमाणात. पण तरीही आर्यनला खोटेपणाने गोवण्यात आल्याचे रोहतगी म्हणाले.

दोन आरोपींना जामीन
मुंबईत क्रूझवर छापा टाकून एकूण ८ लोकांना अटक केली. तेव्हापासून हे सर्वजण तुरुंगातच आहेत. दरम्यान, मुंबईतील विशेष न्यायालयात यासंदर्भात आज सुनावणी सुरू असताना दोन आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला. एनडीपीएस न्यायालयात आर्यनशिवाय या प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जांवर सुनावणी सुरू आहे. याच सुनावणीत दोन आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला. मनीष राजगरिया आणि आविन साहू अशी त्यांची नावे आहेत.

समीर वानखेडेंवर उपस्थित केले प्रश्न
कोर्टरूममध्ये मुकुल रोहतगी यांनी समीर वानखेडे यांच्यावर प्रश्न उपस्थित करत सांगितले की, ‘समीर वानखेडे काल म्हणाले होते की, राजकीय व्यक्तीशी वैर असल्याने हे घडत आहे, पण आज ते म्हणतात की आर्यनचाही यात सहभाग आहे. आर्यनकडून कोणतीही वसुली झालेली नाही. अरबाजनेही त्याच्याकडे ड्रग्ज नसल्याचे सांगितले आहे, असे रोहतगी म्हणाले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या