22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रकांदे यांच्या याचिकेवर १५ जून रोजी सुनावणी

कांदे यांच्या याचिकेवर १५ जून रोजी सुनावणी

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत मत रद्द केल्याप्रकरणी शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. राज्यसभा निवडणुकीत त्यांचे मतदान रद्द केल्याप्रकरणी याचिका दाखल करत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान दिलं आहे. निवडणूक आयोगानं माझी बाजू न ऐकताच निर्णय दिला आहे, तो मला मान्य नाही , असं सुहास कांदे यांनी म्हटलं आहे.

या याचिकेवर १५ जून रोजी हायकोर्टात सुनावणी करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाने आमदार सुहास कांदे यांचे मत बार ठरवतांना जो निकष लावला तो असा की, न दुमडलेली मतपत्रिका घेऊन कांदे फिरत होते. ती इतरांनाही दिसल्यानं नियमाचं उल्लंघन झालं. त्यामुळे त्यांचं मत बाधक ठरतं. शेवटी मतमोजणी करताना आमदार सुहास कांदे यांची मतपत्रिका बाजूला ठेवून मतमोजणी करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते.

दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या यशोमती ठाकूर तसेच शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे मत बाद ठरवण्याची मागणी भाजपाने केली होती. तर महाविकास आघाडीने भाजपाचे सुधीर मुनगंटीवार तसेच अपक्ष आमदार रवी राणा यांच्या मतावर आक्षेप नोंदवला होता. मात्र निवडणूक आयोगाने जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर, सुधीर मुनगंटीवार, रवी राणा यांची मतं ग्रा धरत सुहास कांदे यांचे मत बाद ठरवले.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या