26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeमहाराष्ट्रमराठा आरक्षण स्थगितीवर घटनापीठासमोर ९ डिसेंबर रोजी सुनावणी !

मराठा आरक्षण स्थगितीवर घटनापीठासमोर ९ डिसेंबर रोजी सुनावणी !

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.४ (प्रतिनिधी) मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती हटविण्याबाबत राज्य शासनाने केलेल्या अर्जावर येत्या ९ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता पाच सदस्यीय घटनापिठासमोर सुनावणी होणार असल्‍याची माहिती मराठा आरक्षण विषयक मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे.या निर्णयाने राज्‍य सरकारच्या सातत्‍यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपिठाने ९ सप्टेंबर रोजी दिलेल्या अंतरिम आदेशामुळे नोकरभरती व शैक्षणिक प्रवेशप्रक्रियेतील एसईबीसी प्रवर्गाचे हजारो विद्यार्थी प्रभावित झाले आहेत. त्याचे अनेक गंभीर परिणाम झाले आहेत. त्यामुळे हा अंतरिम आदेश रद्द करण्यात यावा अशी विनंती राज्‍यसरकारने केली होती. राज्य शासनाच्या अर्जावर घटनापिठासमोर तातडीने सुनावणी आवश्यक असल्याची विनंती सरन्यायाधिशांना करण्यात आली होती. राज्य शासनाने यापूर्वी ७ ऑक्टोबर २८ ऑक्टोबर आणि २ नोव्हेंबर रोजी लेखी अर्ज सर्वोच्च न्यायालयात सादर केला होता.

अपघातातील जखमीस पोलिस उपनिरीक्षकांनी दिले रक्त

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या