31.8 C
Latur
Saturday, April 1, 2023
Homeमहाराष्ट्रराज्यात ऊन-थंडीचा लपंडाव

राज्यात ऊन-थंडीचा लपंडाव

एकमत ऑनलाईन

पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठा बदल पाहायला मिळत आहे. या बदलांचा नाशिककरांच्या आरोग्यावर परिणाम होताना दिसत असून परिणामी अनेक शहरातील रुग्णालये हाऊसफुल झाल्याचे दिसते आहे. रात्री कडाक्याची थंडी अन दिवसा कडाक्याचे ऊन अशा दुहेरी वातावरणामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

गेल्या तीन चार वर्षापासून कडाक्याच्या उन्हाचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. त्यातच आता फेब्रुवारीच्या दुस-याच आठवड्यात कडाक्याचे ऊन पडते आहे. एकीकडे ऊन तर रात्रीच्या वेळी थंडी या बदलत्या वातावरणामुळे लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिक आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. उन्हाची तीव्रता पाहता आगामी मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यात उष्णतेच्या लाटा येऊ शकतात. या तीन महिन्यात राज्यात कडाक्याच्या उन्हाचा सामना करावा लागतो. वातावरणातील बदलत्या लहरीपणामुळे नागरिक दिवसा उष्णतेपासून बचाव करण्यासाठी थंड पेयाचा आधार घेतात. तसेच तीव्र किरणांपासून संरक्षण व्हावे याकरिता टोपी घालून खबरदारी घेताना दिसत आहे.

दरम्यान कालचे सरासरी तापमान सकाळी १०.२ अंश तापमानाची नोंद करण्यात आली तर दुपारी हेच तापमान ३४ अंशावर येऊन ठेपल्याचे दिसून आले. त्यामुळे दिवसा कडक ऊन आणि रात्री अंगाला बोचणारी थंडी असे बदल सध्याच्या वातावरणात पाहायला मिळत आहे. तर याच वातावरण बदलामुळे आजारी पडणा-या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. आताशी फेब्रुवारी महिना सुरु असतानाच वातावरणातील तापमान दुस-याच आठवडयात ३४ अंशावर पोहचल्याचे यातून आगामी उन्हाळयाची चाहूल दिसून येते. रात्री थंडीपासून बचाव होण्याकरता उबदार कपडे घालत आहे.

पुढील तीन महिने कडक उन्हाचे
फेब्रुवारी महिन्यातच वातावरणात वाढ झाल्याने पुढील तीन महिने तीव्र उन्हाचे राहण्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे उन्हाची तीव्रता पाहता नागरिकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. शहरात काही दिवसांपूर्वी थंडी गायब झाल्याचे चित्र होते. परंतु उत्तर भारतात बर्फवृष्टीमुळे वातावरणत पुन्हा थंडी वाढली आहे. फेबुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत वातावरण चाळीशी पार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे यंदा नाशिककरांना तीव्र उन्हाळ्याचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

रुग्णालये भरली
पहाटेपासून बोचणारी थंडी तर दुपारी उन्हाचा कडाका यामुळे नागरिक आजारी पडत आहेत. यामुळे दिवसभरात तीन चार लिटर पाणी घ्यावे. जेवढे जास्ती पाणी घेतल्यास त्यामुळे कोरडेपणा खाज येणार नाही. नागरिकांनी जास्त पाणी प्यावे, या दिवसात कोरडेपणा वाढत असल्याने शरीरारात पाणी अधिक असणे आवश्यक आहे. मीठ साखरेचे पाणी, ंिलबू पाणी, ताक घ्यावे. तसेच यादिवसात मूळव्याधाचा त्रास काहींना होतो याकरता दररोज फळांचा वापर अधिक करणे आवश्यक आहे. जेवणात कोरडे अन्न न घेता पालेभाज्या जास्त घ्याव्यात. यासंह जास्त तिकीट खाऊ नयेत. उन्हात जाणे टाळावे असे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या