25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यात ४८ तासांत मुसळधार पाऊस

राज्यात ४८ तासांत मुसळधार पाऊस

एकमत ऑनलाईन

पुणे : मागील काही दिवसांपासून संबंध महाराष्ट्रात पावसाने धुवांधार सुरूवात केली आहे. ऑगस्टच्या सुरुवातीपासून राज्यभर पावसाने धुमाकुळ घातला. मॉन्सूनचा कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकला असल्याने राज्यात मुसळधार पाऊस होणार अशी माहिती हवामान खात्याने दिली होती. त्यानुसार राज्यातील अनेक भागांत दमदार पाऊस झाला आहे.

दरम्यान, आता पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्यानं राज्यभर पुन्हा एकदा पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. पुढील ४८ तासांत राज्यातील पुणे, सातारा, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांना ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. तर विदर्भातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या भागांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पुढील ४८ तासांत दक्षिण कोकण आणि गोवा किनारपट्टीवर तसच घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसाची संततधार सुरुच आहे. सध्या हा जोर कमी असला तरी येत्या काही तासांत पाऊस होणार आहे. काही भागांत पावसाचा जोर कमी झाला असला तरी आता पुन्हा एकदा पाऊस दमदार एंट्री करण्याची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्रात घाट माथ्यासह धरण क्षेत्रात पाऊस सुरुच आहे. दरम्यान, यामुळे कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. आज सकाळी पुन्हा एकदा राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा उघडला आहे. त्यामुळे पंचगंगा नदीची पाणीपातळी पुन्हा एकदा वाढू शकते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या