23.8 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeमहाराष्ट्रपुढील पाच दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

पुढील पाच दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.२७(प्रतिनिधी) बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे पुढील ५ दिवस मुंबई,कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. कोकण किनारपट्टीवर ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून पुढील पाच दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोबतच ३० व ३१ जुलै रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरीत काही ठिकाणी मुसळधार अतिवृष्टीची शक्यता असून हवामान विभागाने सतर्क राहण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत. मुंबई आणि उपनगरात पुढील तीन दिवस हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

केवळ ६ जण कोरोना बाधित

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या