27.7 C
Latur
Wednesday, September 23, 2020
Home महाराष्ट्र मुंबई, कोकणात धुवांधार

मुंबई, कोकणात धुवांधार

एकमत ऑनलाईन

मुंबई : सोमवारी मध्यरात्रीपासून मुंबईत तळ ठोकून बसलेल्या पावसाने तिस-या दिवशी धुवांधार कोसळून ऑगस्टमधील पावसाचा ४६ वर्षाचा विक्रम मोडीत काढला. २००५ च्या प्रलयाची आठवण देणा-या पावसामुळे संपूर्ण शहर जलमय झाले होते. यासोबतच पश्चिम महाराष्ट्र, कोकणातही पावसाची दमदार बँटिंग सुरूच असून, नद्या तुडुंब भरून वाहात आहेत.

कोल्हापुरात पंचगंगेने तर धोक्याची पातळी ओलांडली आहे. तसेच कृष्णा, कोयनेलाही पूर आला आहे. यासोबतच पुण्यातही दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने उजनी धरणाच्या दिशेने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्यातच शुक्रवारपासून पावसाचा वेग ओसरण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

दरम्यान, आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी मुंबईत एनडीआरएफच्या पाच तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा करून स्थितीचा आढावा घेतला. गेले दोन दिवस मुंबई, ठाणे, पालघरसह कोकण व पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरू आहे. बुधवारी पहाटे पावसाचा जोर वाढला व मुंबई व ठाण्यात अक्षरश: समुद्र घुसला की काय, अशी स्थिती निर्माण झाली.

२६ जुलै २००५ ला मुंबईत प्रलयाची स्थिती निर्माण झाली होती. तेव्हा मुंबईच्या पाश्चिम उपनगरात २४ तासात तब्बल ९४४ मिमी पावसाची नोंद झाली होती. परंतु तेव्हाही दक्षिण मुंबईत कमी पाऊस झाला होता. ऑगस्ट महिन्यात तब्बल ४६ वर्षांनंतर १२ तासांमध्ये २९३ मिमी पावसाची नोंद झाली. यापूर्वी ७४ साली ऑगस्ट महिन्यात २५२ मिमी पावसाची नोंद झाली होती. यामुळे दक्षिण मुंबईत प्रथमच एवढे पाणी तुंबले होते. मंत्रालय व नरिमन पॉइंटचा परिसरही जलमय झाला होता.

चर्नी रोड, गिरगाव, बाबुलनाथ परिसर, पेडर रोड आणि वाळकेश्वरसारख्या परिसरातही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. कोकणातही गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यातील नद्या तुडुंब भरून वाहात आहेत. पावसामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वत्र विक्रमी पाऊस झाल्याने शेतजमिनी पाण्याखाली गेल्याने पिकांची हानी झाली आहे.

पंचगंगेने ओलांडली धोक्याची पातळी
पश्चिम महाराष्ट्रातही आज सलग तिस-या दिवशी तुफान पाऊस सुरू आहे. त्यामुळे पंचगंगा नदीने गुरुवारी सांयकाळी धोका पातळी ओलांडल्याने आणि राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडल्याने कोल्हापूर जिल्ह्यात पुराचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एनडीआरफची आणखी दोन पथके दाखल झाली आहेत. सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली. दरम्यान, सांगली जिल्ह्यात कृष्णा तुडुंब भरून वाहात आहे. त्यातच वारणा धरणातूनही आज विसर्ग सोडण्यात आला. त्यामुळे वारणेलाही पूर आला आहे.

पुण्यात दमदार हजेरी; खडकवासला ७५ टक्के भरले
पुणे जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरण ७५ टक्के भरले. त्यामुळे पुण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. तसेच इतर धरणांतही पाणीसाठा वाढला असून, काही धरणांतून विसर्ग सोडण्यात आला आहे.

मराठवाडा कोरडाच
एकीकडे मुंबई परिसर कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पावसाची दमदार बॅटिंग सुरू असून, नद्या, नाले तुडुंब भरून वाहात आहेत. एवढेच नव्हे, तर धरणे, प्रकल्पही भरले असून, धरणांतून विसर्ग सोडला जात असल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. मात्र, दुसरीकडे मराठवाड्यातील अनेक भागात अजूनही दमदार पाऊस झालेला नाही. त्यातच अलिकडे पावसाने ओढ दिल्याने या भागातील पिके सुकू लागली आहेत. मराठवाड्यात आता दमदार पावसाची गरज असताना पावसाने या भागाकडे पाठ फिरवली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतक-यांनी यंदा वेळेत पेरणी केली. त्यामुळे सध्या सर्वत्र पिके जोमाने आली आहेत. मात्र, सध्या पाऊसच नसल्याने पिके सुकू लागली आहेत. पावसाने ओढ दिल्याने याचा पिकांना फटका बसू शकतो.

Read More  गुगल क्लासरूमने राज्यात दूरस्थ शिक्षणाची सोय!

ताज्या बातम्या

हिमायतनगर तालुक्यातील असंख्य नाल्यातून अवैध वाळू चा उपसा तेजीत

हिमायतनगर (प्रतिनिधी ) : तालुक्यातील पैनगंगा नदीला पूर परिस्थिती असल्याने परिसरातील वाळू माफियानी त्यांचा मोर्चा आता नाल्याकडे वळविला आहे दि.21 रोजी सरसम जवळील भोकर...

हिमायतनगर येथील बँक शाखेच्या आडमुठे धोरणामुळे शेतकर्‍यांना वेळेवर पिक कर्ज मिळेना

हिमायतनगर:-(ता.प्रतिनिधी )तालुक्यातील भारतीय स्टेट बँक शाखा हिमायतनगर येथील अधिकारी यांच्या आडमुठे धोरणामुळे शेतकर्‍यांना वेळेवर पिक कर्ज मिळत नसल्याने शेतकर्‍यांतून बँक शाखेच्या मनमानी कारभारा बाबत...

पोलिसांच्या आर्शिवादाने दारु धंदे जोमात,पोलिस निरक्षीक लक्ष देतील का? नारीकातून चर्चा

सांगोला (विकास गंगणे) कोरोनाने अवघ्या जगाला वेढले आहे. जगण्याचा एक अविभाज्य भाग म्हणून आधी कोरोनापासून दूर राहण्याची काळजी प्रत्येकजण घेताना दिसतो आहे. यात समाजातील...

सतत होणाऱ्या बंद मुळे व्यापारी व व्यवसाय धारकांचे कंबरडे मोडले, दुकानदारतून तीव्र नाराजी

श्रीपुर (दादा माने) : श्रीपुर ता माळशिरस गेल्या सहा महिन्यांपासून सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे त्यामुळे गेली तीन महीने छोटे मोठे व्यवसाय पुर्णपणे बंद...

बंँक अधिकार्‍यांच्या बैठकीत कर्जासाठी त्रस्त झालेल्या शेतकर्‍याने रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा केला प्रयत्न

मंगळवेढा : मंगळवेढा पंचायत समितीमध्ये राष्ट्रीयकृत बंँक अधिकार्‍यांची शेतकर्‍यांच्या समवेत कर्जाविषयी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत चक्क कर्जासाठी त्रस्त झालेल्या एका शेतकर्‍याने अंगावर...

पंढरपुरात कलावंतांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन

पंढरपूर : कलावंतांना कार्यक्रमांची परवानगी देण्यात यावी, कोरोनाच्या संकटामुळे काही महिन्यांपासून जत्रा, यात्रा, उत्सव बंद आसल्याने अडचणीत सापडलेल्या कलावंतांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी....

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात चार वर्षे बीएड करणार्‍यांनाच या नोकरीस पात्र ठरवले जाईल

जुन्या पदवी धारकांना 2030 नंतर शिक्षकाची नोकरी मिळणार नाही नवी दिल्ली, वृत्तसंस्था : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात बीएडला चार वर्षे करण्यात आली आहेत. जुन्या पदवी धारकांना 2030...

‘केम छो वरळी’ : परीसरातील अनेक चाळींमध्ये लोकांच्या घरात पाणी शिरलं

एक व्हिडीओ मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला  ट्वीट ; मुंबईत प्रचंड पाऊस : वरळी परीसरातील अनेक चाळींमध्ये घरात पाणी शिरलं मुंबई : मुंबईमध्ये काल...

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देणार -आमदार शहाजीबापू पाटील

चिकमहुद (वैभव काटे) : सांगोला तालुक्यांमध्ये दिनांक 16 सप्टेंबर व 17 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून अनेक जनावरे दगावली...

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना संसर्ग

मुंबई : राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष झालंय. त्यांनी स्वतःच ट्वीट करत याबाबत माहिती दिली. यावेळी वर्षा गायकवाड म्हणाल्या, 'नमस्कार,...

आणखीन बातम्या

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात चार वर्षे बीएड करणार्‍यांनाच या नोकरीस पात्र ठरवले जाईल

जुन्या पदवी धारकांना 2030 नंतर शिक्षकाची नोकरी मिळणार नाही नवी दिल्ली, वृत्तसंस्था : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात बीएडला चार वर्षे करण्यात आली आहेत. जुन्या पदवी धारकांना 2030...

‘केम छो वरळी’ : परीसरातील अनेक चाळींमध्ये लोकांच्या घरात पाणी शिरलं

एक व्हिडीओ मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला  ट्वीट ; मुंबईत प्रचंड पाऊस : वरळी परीसरातील अनेक चाळींमध्ये घरात पाणी शिरलं मुंबई : मुंबईमध्ये काल...

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना संसर्ग

मुंबई : राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष झालंय. त्यांनी स्वतःच ट्वीट करत याबाबत माहिती दिली. यावेळी वर्षा गायकवाड म्हणाल्या, 'नमस्कार,...

अशा आरोपांमुळे माझी प्रतिमा बिघडवली जात आहे-दीया मिर्झा

मुंबई : सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाशी संबंधीत ड्रग्ज केसमध्ये अनेक मोठ्या कलाकारांची नावे समोर येत आहे. ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी अभिनेत्री दीपिका पादुकोण पाठोपाठ अभिनेत्री...

लातूर जिल्ह्यात २४० नवे रुग्ण; रुग्णसंख्येची गती मंदावली

लातूर : गत आठवड्याच्या तुलनेत या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजेच दि. २१ सप्टेंबरपासून जिल्ह्यातील रुग्णसंख्येची गती मंदावल्याचे आढळून आले असून, मंगळवार दि. २२ सप्टेंबर रोजी...

राजस्थानचा रॉयल विजय; चेन्नई संघाला हे आव्हान पेलवले नाही

शारजा : संजू सॅमसन आणि कर्णधार स्टिव्ह स्मिथ यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने २१६ धावांचा डोंगर उभा केला. परंतु सॅमसन माघारी परतल्यानंतर राजस्थानच्या...

चीनला कुठल्याही प्रकारच्या युद्धात रस नाही- राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग

चीन  : चीन हा एक विकसनशील देश आहे, चीन शांततेसाठी, सहकार्यासाठी वचनबद्ध असून चीनला कुठल्याही प्रकारच्या युद्धात रस नाही असे वक्तव्य राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग...

ललित-54 वाण यशस्वी : प्रत्येक हंगामात भेंडी लावा आणि अधिक नफा मिळवा

छत्तीसगड : छत्तीसगडच्या देवी राजमोहिनी कृषी महाविद्यालय व संशोधन केंद्राचे डीन डॉ. व्ही.के. सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली ललित-५४ प्रकारातील भेंडी ची चाचणी यशस्वी झाली आहे....

ऑक्सिजनचं प्रमाण तपासणारी कोणतीही अ‍ॅप्स डाऊनलोड करू नका : केंद्र सरकार

नवी दिल्ली: कोरोना काळात अनेक अ‍ॅप्सच्या मदतीनं डेटा चोरी करण्याचे प्रकार अगदी सर्रासपणे सुरू आहेत. कोरोनाची लागण झाल्यावर शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे...

भिवंडीतील मृतांचा आकडा २५ वर

ठाणे : भिवंडीत तीन मजली इमारतीचा एक भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृतांचा आकडा २५ झाला आहे. अद्यापही इमारतीच्या ढिगा-याखाली काही रहिवासीअडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत...
1,258FansLike
117FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...