24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्रसप्टेंबरमध्ये राज्यात मुसळधार पाऊस

सप्टेंबरमध्ये राज्यात मुसळधार पाऊस

एकमत ऑनलाईन

पुणे : राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. कालपासून राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. विशेषत: नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात जोराचा पाऊस पडत आहे. दरम्यान, सप्टेंबर महिन्यात पावसाचे रौद्ररुप पाहायला मिळणार असून शेवटच्या टप्प्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस (१०९ टक्के) पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या टप्प्यामध्ये देशात बहुतांश भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

मुंबई, ठाण्यासह संपूर्ण कोकण विभाग, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा आणि पूर्व विदर्भात शेवटच्या टप्प्यामध्ये काही भागांत मुसळधारांची शक्यता आहे. देशाचा पूर्वोत्तर भाग आणि पश्चिम-उत्तर राज्यांमध्ये मात्र पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या टप्प्यामध्ये देशात बहुतांश भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे. प्रशांत महासागरात ‘ला नीना’ स्थिती कायम आहे. अशा वातावरणात सरासरीच्या तुलनेत १०३ टक्के पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सप्टेंबरमध्ये देशाच्या बहुतांश भागात दिवसाचे कमाल तापमान सरासरीच्या जवळ किंवा त्यापेक्षाही कमी राहण्याची शक्यता आहे. पावसाचे प्रमाण कमी राहणा-या उत्तर-पश्चिम भागासह दक्षिण-पूर्व राज्यांमध्ये काही भागातच तापमानात वाढ दिसून येईल.

अतिवृष्टी कुठे होणार?
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, नाशिक, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, वर्धा आदी जिल्ह्यांत या महिन्यात अधिक पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, देशाच्या तीस ते चाळीस टक्के भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे. तर पन्नास टक्के भागांत सरासरीनुसार पाऊस होण्याची शक्यता आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या