23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रकिरीट सोमय्यांना हायकोर्टाचा दिलासा

किरीट सोमय्यांना हायकोर्टाचा दिलासा

एकमत ऑनलाईन

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्यांना हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं किरीट सोमय्यांना अटकेपासून संरक्षण दिलेआहे. तसेच, अटक झाल्यास ५० हजारांच्या जामीनावर सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, सोमवार १८ एप्रिलपासून सलग चार दिवस चौकशीला हजेरी लावण्याचे निर्देशही किरीट सोमय्यांना दिले आहेत.

भाजप नेते किरीट सोमय्या यांना आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी अकरा वाजता चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटिस पाठवली होती. या प्रकरणात किरीट सोमय्यांची बाजू मांडण्यासाठी वकील विवेकानंद गुप्ता हे पोलीस आयुक्त कार्यालयात गेले होते. त्यामुळे आज बुधवारीही किरीट सोमय्या चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. तसेच, आयएनएस विक्रांत प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून किरीट सोमय्या नॉट रिचेबल आहेत. त्यावर बोलताना योग्य वेळी किरीट सोमय्या समोर येतील, असे त्यांचे वकील विवेकानंद गुप्ता यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या