23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रनारायण राणेंना तातडीचा दिलासा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

नारायण राणेंना तातडीचा दिलासा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

एकमत ऑनलाईन

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणेंना कोणताही तातडीचा दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. जुहू येथील अधीश बंगल्यावरील कारवाईविरोधात प्राधिकरणाकडेच दाद मागण्याचे नारायण राणेंना निर्देश गुरूवार दि. १६ जून रोजी उच्च न्यायालयाने राणेंना दिले आहेत. तसेच २४ जूनपर्यंत तिथल्या बेकायदेशीर बांधकामावर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश कायम आहेत असेही स्पष्ट केले आहे.

एमसीझेडएमएच्या जिल्हा स्तरीय समितीने पाठवलेली नोटीस योग्यच असल्याचा महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांचा दावा मान्य करत ही नोटीस बेकायदेशीर असल्याचा दावा करत राणेंनी आपल्या कंपनी मार्फत हायकोर्टात दाखल केलेली याचिका निकाली काढण्यात आली. येत्या २२ जूनला यावर सुनावणी घेण्याचे निर्देश प्राधिकरणाला देण्यात आले असून प्राधिकरणाचा निर्णय विरोधात गेल्यास त्यावर पुन्हा दाद मागण्याचा पर्याय राणेंसाठी खुला आहे असे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने आपल्या निकालात स्पष्ट केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या