मुंबई : सचिन वाझेच्या बँक खात्यात दीड कोटी रुपये आहेत. सहायक पोलिस निरीक्षक (एपीआय) श्रेणीत असलेल्या पोलिस अधिका-याकडे इतके पैसे कुठून व कसे आले. हे पैसे खंडणी वसूल करून कमावलेले आहेत का, या सा-याची कसून चौकशी करायची आहे, असे आज अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी एनआयए कोर्टात मांडले. त्यानंतर सचिन वाझेच्या कोठडीत ९ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. मनसुख हिरेन हे स्वत:ही अँटिलियाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेल्या जिलेटिन कांड्याच्या कटात सहभागी होते. नंतर अन्य आरोपींनी मिळून मनसुख हिरेन यांच्या हत्येचा कट २ व ३ मार्च रोजी रचला, असा गंभीर दावाही एनआयएतर्फे कोर्टात केला.
या प्रकरणी तपास करण्यासाठी सचिन वाझेची एनआयए कोठडी वाढवून मागितली. त्यानंतर ही मागणी कोर्टाने मान्य केली. याच प्रकरणात अटकेत असलेला निलंबित पोलिस कॉन्स्टेबल विनायक शिंदे आणि क्रिकेट सट्टेबाज नरेश गौड या दोघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबईत उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याबाहेर जिलेटिनच्या कांड्यासह स्कॉर्पिओ गाडी पार्क केली होती. हा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली होती. या कटात वाझेचा हात असल्याचा दावा एनआयएने केला होता. याच प्रकरणातून मनसुख हिरेन यांची हत्या झाल्याचेही एनआयएचे म्हणणे आहे.
आता एनआयएने कोर्टात आणखी एक नवा दावा केला असून, या कटात थेट मनसुख हिरेन यांचाही हात असून, या प्रकरणाच्या चौकशीसाठी वाझेची कोठडी वाढून देण्याची मागणी केली. तसेच वाझेच्या बँक खात्यात दीड कोटी एवढी मोठी रक्कम कुठून आली, याचाही तपास करायचा असल्याचे एनआयने म्हटले. त्यामुळे वाझेची कोठडी ९ एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे.
जिल्ह्यात १२५५ नविन कोरोना बाधित; २६ जणांचा मृत्यू