28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रहिरेन यांच्या हत्येची प्रदीप शर्माला सुपारी?

हिरेन यांच्या हत्येची प्रदीप शर्माला सुपारी?

एकमत ऑनलाईन

सचिन वाझेने ४५ लाख दिले, एनआयएचा दावा
मुंबई : मुंबई पोलिस दलातील तत्कालीन सहायक निरीक्षक सचिन वाझे याने मनसुख हिरेन यांच्या हत्येसाठी प्रदीप शर्मा यांना ४५ लाख रूपये दिले होते, असे प्रतिज्ञापत्र राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) न्यायालयात दाखल केले आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी १७ जुलै रोजी ठेवली आहे.

मनसुख हिरेन यांच्या हत्येचा कट मुंबई पोलिस आयुक्तांच्या इमारतीत रचण्यात आला होता. प्रदीप शर्मा आणि इतर आरोपी विविध बैठकांना उपस्थित होते, असे राष्ट्रीय तपास यंत्रणेनेने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने मनसुख हिरेन हत्या प्रकरणात प्रदीप शर्माला अटक केली होती. तेव्हापासून शर्मा न्यायालयीन कोठडीत आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतल्या अँटालिया या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळली होती. ही स्कॉर्पिओ मनसुख हिरेन यांच्या नावावर होती.

या घटनेच्या काही दिवसांनीच म्हणजे ५ मार्चला मुंब्रा इथल्या रेतीबंदर भागात मनसुख हिरेनचा मृतदेह सापडला होता. ही हत्या असल्याचा दावा करत एनआयएने सचिन वाझे यांना अटक केली. सध्या ते कोठडीत आहेत. तसेच आणखी ८ आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले. हे आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

नाकावर क्लोरोफॉर्म टाकून हत्या
मनसुख हिरेन यांची हत्या झाली, त्या रात्री नेमके काय घडले, याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्या रात्री आरोपींनी हिरेन यांच्या नाकावर जबरदस्ती क्लोरोफॉर्म टाकले. त्यामुळे हिरेन तात्काळ बेशुद्ध पडले. त्यानंतर आरोपींनी त्यांची हत्या केली. पोस्टमार्टमच्या रिपोर्टमध्ये हत्येपूर्वी हिरेन यांच्या चेह-यावर मार लागलेला होता.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या