16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeमहाराष्ट्रगृहमंत्री शाह २० नोव्हेंबरला पुणे दौ-यावर

गृहमंत्री शाह २० नोव्हेंबरला पुणे दौ-यावर

एकमत ऑनलाईन

पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येत्या २० नोव्हेंबरला पुणे दौ-यावर असणार आहे. कै. पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून न-हे, आंबेगाव येथे साकारत असलेल्या ‘शिवसृष्टी’च्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते पार पडणार आहे.

२० नोव्हेंबरला सकाळी ११.३० वाजता हा सोहळा पार पडणार आहे. शिवसृष्टीची संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी बाबासाहेब पुरंदरे यांनी स्थापन केलेल्या महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान या संस्थेचे विश्वस्त जगदीश कदम यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे. अमित शाहांबरोबर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा हे नेते उपस्थित असणार असल्याची माहिती कदम यांनी दिली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या