21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeमहाराष्ट्रनक्षलग्रस्त भागात गृहमंत्र्यांची दिवाळी

नक्षलग्रस्त भागात गृहमंत्र्यांची दिवाळी

एकमत ऑनलाईन

गडचिरोली: नक्षलवादी हिंसाचाराच्या विरोधात लढणाºया गडचिरोली जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम भागाला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिवाळीनिमित्त सपत्नीक भेट देऊन पोलीस जवानांची उमेद वाढवली. देशमुख यांनी शनिवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गडचिरोलीपासून तीनशे किलोमीटर अंतरावर असलेल्या पातागुडमला भेट देऊन जवानांसोबत दिवाळी साजरी केली.

दिवाळीच्या निमित्ताने पहिल्यांदाच गृहमंत्री गडचिरोली इथे येत असल्याने पोलीसांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. गृहमंत्र्यांनी येथील पोलीसांशी संवाद साधला असून त्यांच्यासोबत फराळही केला. नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या पोलीसांच्या कुटुंबियांची आस्थेने चौकशी केली. तसंच, त्यांच्या घरांना भेटी देत कुटुंबियांशी संवाद साधत लहान मुलांसमवेत गप्पा गोष्टी केल्या. या भागामध्ये दौंड आणि कोल्हापूर येथील राज्य राखीव पोलीस बलाच्या तुकड्या कार्यरत आहेत. गृहमंत्र्यांनी त्यांचे विशेष कौतुक केले.

पाकिस्तानविरोधात मानवाधिकार उल्लंघनाचा मुद्दा मांडावा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या