27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeमहाराष्ट्रतुम्ही बाळासाहेबांचे नातू असल्यानेच सन्मान!

तुम्ही बाळासाहेबांचे नातू असल्यानेच सन्मान!

एकमत ऑनलाईन

मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्तास्थापन केल्यानंतर आता राजकीय वाद उफाळून येत आहेत. दरम्यान, गद्दार हे गद्दारच आहेत. मात्र, ज्यांना वाटते त्यांनी अजूनही परत यावे असे वक्तव्य शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केले होते. आता यावर शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी ठाकरेंना खडे बोल सुनावले आहेत.

मंत्रिमंडळ विस्ताराआधी दीपक केसरकर हे गुरुवारी सायंकाळी शिर्डी येथे साई दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद अनेक प्रश्नांवर सडेतोड उत्तरे दिली. ते म्हणाले, आदित्य ठाकरे खूप लहान आहात, गद्दार कोणाला म्हणता? तुम्ही बाळासाहेबांचे नातू असाल तर असा शब्द तुमच्या तोंडात येताना दहा वेळा विचार करायला हवा. आम्हीही खूप बोलु शकतो, पण आम्ही बोलणार नाही. मी आदित्य ठाकरेंपेक्षा दुप्पट वयाचा माणुस आहे.

मात्र, जेव्हा आदित्य ठाकरे येतात तेव्हा मी उठून उभा राहातो कारण तो मान त्यांचा नव्हे तर बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंचा आहे असे म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे.

आपण कसे बोलावे हे उद्धव ठाकरेंकडून शिकावे
तुमच्याकडे तो वारसा आला असून तुम्हाला सुद्धा तो मान मिळाला आहे. आपण कसे बोलावे हे त्यांनी उद्धव ठाकरेंकडून शिकावे, तुम्ही ते संजय राऊतांकडून शिकू नये, असा सल्ला दीपक केसरकरांनी आदित्य ठाकरेंना दिला आहे. मागील काही दिवसांपासून एकनाथ शिंदे गटाच्या अनेक आमदारांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, त्यांनी आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यावर टीकेची झोड उठवली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या