29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeमहाराष्ट्रन्यायालयाच्या आदेशाचा सन्मान - नवाब मलिक

न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान – नवाब मलिक

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची माहिती दिली. उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शरद पवार यांना भेटून राजीनामा दिला असल्याची माहिती दिली. शरद पवारांनी यासाठी होकार दिला आहे, असे नवाब मलिक यांनी सांगितलं. सीबीआय चौकशी करत असताना गृहमंत्री पदावर राहणं योग्य नाही असे देशमुख म्हणाले. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. शेवटी आम्हाला न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान ठेवणे गरजेचे आहे. राजीनामा दिला, विषय संपला, असंही नवाब मलिक यांनी सांगितले. दरम्यान अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्याने गृहमंत्रीपदी कोणाचा वर्णी लागणार याची चर्चा सुरु झाली आहे.

नवाब मलिक यांना गृहखात्याचा पदभार कोणाकडे असेल असं विचारण्यात आले असता त्यांनी सांगितले की, एखाद्या मंत्र्याने राजीनामा दिल्यानंतर साहजिकच मुख्यमंत्र्यांकडे त्या खात्याची जबाबदारी असते. नंतर मुख्यमंत्री ही जबाबदारी दुस-याकडे देतील. तीन पक्षांचं सरकार असताना चर्चा करुन जो निर्णय होईल तो स्वत: मुख्यमंत्री लोकांना सांगतील़

चौकशीत अनेक विषय बाहेर – चंद्रकांत पाटील
अनिल देशमुख यांचा राजीनामा माननीय उच्च न्यायालयाच्या निकालानंतर ही झाला नसता, तो शरद पवारांच्या एका आदेशावर झाला. जोपर्यंत राजकारणात आणि समाजकारणात चुकेल त्याची शिक्षा हा पायंडा पडत नाही तोपर्यंत लोकशाही सुदृढ होणार नाही ़पंधरा दिवसांच्या सीबीआय चौकशीत अनेक विषय बाहेर येतील असे देखील पाटील यावेळी म्हणाले.

जनतेच्या मनातले सरकार नाही- फडणवीस
महाविकास आघाडीचं हे सरकार जनतेच्या मनातले सरकार नाही. हे आता सव्वा वर्षानंतर राज्यातील जनताच अनुभवत आहे. यांनी महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळे फासण्याचे काम केले आहे,सरकारमधील मंत्र्यांच्या आर्शीवादाने हफ्ते वसुलीचे काम सुरु होते. सीबीआय चौकशी होऊ नये म्हणून सरकारकडून प्रयत्न केले जात होते.

देशमुखांचा राजीनामा वेदनादायी : अमोल मिटकरी
आबानंतर आदर्श गृहमंत्री म्हणून पाहिले गेलेल्या अनिल देशमुखांना भाजपच्या सूडाच्या राजकारणामुळे राजीनामा द्यावा लागला अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनी दिली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी इतके वर्ष राजकीय कारकीर्द सांभाळली, ज्यात त्यांच्यावर कधीच भ्रष्टाचारचे आरोप झाले नव्हते. मंत्रिमंडळात एक आदर्श गृहमंत्री म्हणून आबानंतर त्यांच्याकडे पाहिले गेले. भाजपच्या सूडाच्या राजकारणामुळे आज त्यांना राजीनामा द्यावा लागला. वेदनादायी असे ट्वीट अमोल मिटकरी यांनी केले आहे.

अनेक राजीनामे घ्यावे लागतील :पंकजा मुंडे
गृहमंत्री देशमुख यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. देर आये पर दुरुस्त नहीं आये , या सरकारला आणखी अनेक राजीनामे घ्यावे लागतील म्हणजे दुरुस्त आये म्हणणे शक्य तरी होईल, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी टोला लगावला.

आता नवा वसुली मंत्री कोण? : चित्रा वाघ
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर राजीनामा दिला. पण आता प्रश्न उरतो की, नवा वसुली मंत्री कोण?असा खोचक सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे. मंत्रिमंडळातील एखादा चेहरा बदलल्याने महाविकास आघाडी सरकारचा भ्रष्ट हेतू काही बदलणार नाही, अशी टीका देखील चित्रा वाघ यांनी केली आहे.

याला म्हणतात नैतिकता : मनसे
मनसेच्या फायर ब्रँड नेत्या रुपाली ठोंबरे यांनी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.ठोंबरे म्हणाल्या की, याला म्हणतात नैतिकता.अशी नैतिकता भाजपने कधीच दाखवली नाही हे देखील तितकेच खरे.त्यांच्याकडे मंर्त्यांना थेट क्लिनचीट दिली जायची.त्यामुळे भाजपने कधीतरी अशी नैतिकता आचरणात आणावी,असा सल्ला देत रुपाली ठोंबरे यांनी भाजपला सुनावले आहे.

सामने योजनेनुसार होतील – नवाब मलिक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या