25.5 C
Latur
Saturday, September 18, 2021
Homeमहाराष्ट्रगुप्त चौकशीचे मिनिटा-मिनिटाचे तपशील माध्यमांमध्ये कसे येत आहेत? : सचिन सावंत

गुप्त चौकशीचे मिनिटा-मिनिटाचे तपशील माध्यमांमध्ये कसे येत आहेत? : सचिन सावंत

एकमत ऑनलाईन

मुंबई : बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात समोर आलेल्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटनंतर चौकशीत अनेक अभिनेत्रींची नवे समोर आली आहेत. त्यानंतर एनसीबीकडून संबंधित अभिनेत्रींना समन्स पाठवण्यापासून चौकशी आणि नंतर अटकेचीही कारवाई होत आहे. मात्र, या सर्व घटनाक्रमांमध्ये एनसीबीच्या कार्यालयातील गुप्त चौकशीचे मिनिटा-मिनिटाचे तपशील माध्यमांमध्ये येत आहेत. यावरुनच महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी एनसीबीवर प्रश्न उपस्थित केले आहेत

सचिन सावंत यांनी एनसीबीच्या कार्यालयातील गुप्त चौकशीचे मिनिटा-मिनिटाचे तपशील माध्यमांमध्ये कसे येत आहेत? असा प्रश्न विचारला आहे. तसेच एनसीबीने समोर येऊन माध्यमांमध्ये सुरु असलेल्या चर्चेचं खंडन करावं, असं आवाहन देखील त्यांनी केले आहे. एनसीबीने असे न केल्यास गुप्त चौकशीची माहिती एनसीबीकडूनच हेतुपूर्वक पसरवली जात आहे, असे मानण्यात येईल, असा इशाराही यावेळी सचिन सावंत यांनी दिला आहे.

‘माध्यमांमध्ये एनसीबीच्या ऑफिसमध्ये काय सुरु आहे याबद्दल मिनिटा-मिनिटाची चर्चा सुरु आहे. एनसीबीने समोर येऊन या सर्व चर्चा किंवा दाव्यांचं खंडन करावं. जर त्यांनी तसं केलं नाही तर एनसीबीकडून हेतुपूर्वक ही माहिती लीक केली जात आहे असं समजलं जाईल. जर हे खरं ठरलं तर फार दुर्दैवी असेल,’. असे सचिन सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

युक्रेनमधील एअरफोर्सचं विमान कोसळून मोठी दुर्घटना, २२ कॅडेट्सचा मृत्यू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या