22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeमहाराष्ट्रअक्षय कुमारला हेलिकॉप्टरची परवानगी कशी दिली?; भुजबळांनी दिले चौकशीचे आदेश

अक्षय कुमारला हेलिकॉप्टरची परवानगी कशी दिली?; भुजबळांनी दिले चौकशीचे आदेश

एकमत ऑनलाईन

नाशिक:अभिनेता अक्षयकुमारने तीन दिवसांपूर्वी गुपचूप केलेला नाशिक दौरा वादाच्या भोवºयात सापडला आहे. टाळेबंदीचे निर्बंध शिथील होत असले तरी हॉटेल, लॉज, रिसॉर्ट आजही बंद आहेत. या स्थितीत अक्षयकुमारचे खासगी हेलिकॉप्टर उतरण्यास परवानगी मिळाली. त्याच्यासाठी त्र्यंबक रस्त्यावरील अलिशान रिसॉर्टचे दरवाजे उघडण्यात आले. विशेष म्हणजे त्याच्या दिमतीला पोलिसांची सुरक्षा व्यवस्था देखील होती. खास मान मरातब मिळालेला हा दौरा वादात सापडल्यानंतर प्रशासनाने कानावर हात ठेवले आहेत. याबद्दल प्रश्नांचा भडिमार झाल्यानंतर या दौºयात काही गैर घडले असेल तर चौकशी केली जाईल, असे प्रथम सांगणाऱ्या पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नंतर घूमजाव केले. नाशिक पोलिसांकडून त्यांना कुठलीही सुरक्षाव्यवस्था पुरविली गेली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

तीन दिवसांपूर्वी अक्षयकुमार खासगी हेलिकॉप्टरने नाशिक दौऱ्यावर आला होता. अंजनेरीतील सपकाळ नॉलेज हब या शैक्षणिक संस्थेच्या हेलिपॅडवर त्याचे खासगी हेलिकॉप्टर उतरले. त्याच्या स्वागताला शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखांसह प्रशासकीय यंत्रणेतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित असल्याचे सांगितले जाते. या दौºयाबाबत प्रशासकीय पातळीवर कमालीची गोपनीयता बाळगली गेली. त्र्यंबकेश्वार रस्त्यावरील ग्रेप काऊंटी रिसॉर्टमध्ये त्याने एक दिवस मुक्काम केला. मुळात टाळेबंदीच्या नव्या टप्प्यात काही निर्बंध उठले असले तरी हॉटेलमध्ये भोजनाची परवानगी मिळालेली नाही. पार्सल स्वरुपात खाद्यापदार्थ न्यावे लागतात. जिल्ह्याबाहेर कोणाला प्रवास करायचा असेल तर वाहन क्रमांक, प्रवास करणा-यांची नावे, प्रवासाचे कारण आदी तपशील द्याावा लागतो. अक्षयकुमारला मात्र थेट हेलिकॉप्टरने ये-जा करण्यास परवानगी मिळाली. त्याच्यासाठी रिसॉर्ट खुले करण्यात आले. यावर गदारोळ सुरू झाल्यानंतर प्रशासनाने या दौऱ्याबाबत जणूकाही माहितीच नसल्याची भूमिका घेतली आहे.

एका खासगी कंपनीने हेलिकॉप्टर उतरण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे परवानगी मागितली होती. त्यासाठी ग्रामीण पोलीस दलाने १० अटी-शर्तींवर ना हरकत प्रमाणपत्र दिले. अंतिम परवानगी देण्याचा अधिकार जिल्हा प्रशासनाचा असतो. अंजनेरी येथील हेलिपॅडवर अक्षयकुमार हेलिकॉप्टरने उतरला. हे ठिकाण ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत येते. त्यांना याविषयी कोणतीच माहिती नव्हती. ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत शहर पोलिसांनी अक्षयकुमारला सुरक्षा व्यवस्था दिली काय, असा प्रशद्ब्रा उपस्थित होत आहे. त्याच्यासाठी अलिशान रिसॉर्ट तत्परतेने उघडण्यात आले. तिथे त्याने एक दिवस वास्तव्य केले. अक्षयकुमार तिथे वास्तव्य करणार असल्याची आम्हांला कल्पना नसल्याचा पवित्रा ग्रामीण पोलिसांनी घेतला आहे. या संदर्भात नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या प्रमुख डॉ. आरती सिंह यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या काळात आपण सुट्टीवर असल्याचे सांगितले.

अक्षयकुमारच्या दौऱ्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. हेलिकॉप्टरला उतरण्यास परवानगी, रिसॉर्टमधील वास्तव्य याबाबत प्रशासनाकडून माहिती घेतली. त्यानुसार अक्षयकुमार वैद्याकीय उपचारासाठी नाशिकमध्ये आला होता. करोनातील कार्याबद्दल नाशिकचे पोलीस आयुक्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गेले होते. शहर पोलिसांचा ताफा अक्षयकुमारसाठी नव्हे तर पोलीस आयुक्तांसोबत होता. नाशिक पोलिसांकडून त्यांना कुठलीही सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली नाही. त्यामुळे या दौऱ्याबाबत कुठलीही संदिग्धता राहिलेली नाही.

Read More  पाक परराष्ट्रमंत्री कोरोनाग्रस्त

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या