25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रइतक्या वर्षांनी शरद पवारांना ब्राह्मण समाजाची आठवण कशी आली?

इतक्या वर्षांनी शरद पवारांना ब्राह्मण समाजाची आठवण कशी आली?

एकमत ऑनलाईन

टेंभुर्णी : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज शनिवारी (ता. २१) राज्यातील ब्राह्मण संघटनांची बैठक बोलावली आहे. २० ते २२ संघटनांना शरद पवारांनी निमंत्रण दिले आहे. यावर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘इतक्या वर्षांनी शरद पवार यांना ब्राह्मण समाजाची आठवण आली. कोणालाही बैठक बोलावण्याचा अधिकार आहे. कोणत्याही समाजाला बैठक बोलावण्याचा अधिकार आहे. याकडे नकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज नाही’.

शरद पवार यांचा कार्यक्रम आज पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात सायंकाळी पाच वाजता पार पडणार आहे. यासाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाबरोबर अनेक ब्राह्मण संघटनांना कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. २० ते २२ संघटना चर्चेसाठी कार्यक्रमाला उपस्थित राहतील. यावेळी राज्यातील वातावरण निवळण्याचा बैठकीच्या माध्यमातून प्रयत्न होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मागील काही दिवसांपासून शरद पवारांविरुद्ध वातावरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्यावर अनेक आरोप केले. ते ब्राह्मणांचा विरोध करतात, छत्रपती शिवाजी महाराजांचे कधीही नाव घेत नाहीत, असे अनेक आरोप करण्यात आले. अशात शरद पवार यांनी ब्राह्मण संघटनांची बैठक बोलावली आहे.

या बैठकीवरूनही राजकारण सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांच्या बैठकीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. देवेंद्र फडणवीस यांनीही शरद पवारांवर हल्ला केला आहे. इतक्या वर्षांनी शरद पवार यांना ब्राह्मण समाजाची आठवण आली. म्हणून त्यांनी बैठक बोलावली आहे. कोणालाही बैठक बोलावण्याचा अधिकार आहे. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या