22.7 C
Latur
Wednesday, April 14, 2021
Homeमहाराष्ट्रकारागृह बंद असताना विषाणू पोहोचला कसा? तपासण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली

कारागृह बंद असताना विषाणू पोहोचला कसा? तपासण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली

एकमत ऑनलाईन

औरंगाबादमधील हार्सूल करागृहात १८०० कैदी : २९ जणांना करोनाबाधा

औरंगाबाद : राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस बाधितांची संख्या वाढत आहे. रविवारी (दि.७) औरंगाबाद जिल्ह्यात ६४ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या २०१४ झाली आहे. यापैकी ११८६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. नव्या आणि कोरोनामुक्त भागात शिरकावाचे सत्र सुरूच असून बाधितांचा आकडा दोन हजाराच्या पार गेला आहे. मृत्यूचा आकडा शंभरीच्या घरात पोहचत आहे. आतापर्यंत ९९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

शनिवारी औरंगाबाद शहरातील हर्सूल कारागृहातील परिसरात पण २९ जणांना करोनाबाधा झाली आहे. करोना विषाणूची लागण तपासणीसाठी कारागृहातील ११० कैद्यांच्या लाळेचे नमुने तपासण्यात आले होते. त्यातील २९ जणांना लागण झाली आहे. महापालिकेच्या आरोग्य अधिकारी नीता पाडाळकर म्हणाल्या ‘कारागृह बंद असताना विषाणू पोहोचला कसा, याचा शोध घेण्यासाठी कोणत्या सकारात्मक व्यक्तीच्या संपर्कात कोणते कर्मचारी आले होते, हे तपासण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे’. शहरातील कारागृहाची क्षमता ५७९ एवढी असून सध्या औरंगाबादमधील हार्सूल करागृहात १८०० कैदी आहेत.

Read More  कोळसा खाणीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

औरंगाबाद शहरातील दिलासादायक गोष्ट हि कि, करोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ६५ टक्कय़ाहून अधिक आहे. आजारातून बरे झालेल्या व्यक्तींची संख्या दिवसागणिक वाढत आहे. आतापर्यंत ११८४ जणांना करोनावर मात केली आहे. तर उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या सातशेपार गेली आहे. ७३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर आज आढळलेल्या रुग्णांमध्ये २७ महिला आणि ३७ पुरूष रूग्णांचा समावेश आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,474FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या