नाशिक : नाशिकमध्ये बोगस नावाने कंपनी सुरू करून, त्या माध्यमातून कंपनी मालकाने मुंबईतील बनावट कंपन्यांकडून ८५ कोटींची खोटी बिले घेऊन जीएसटी चुकवेगिरी केल्याचा प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाच्या (जीएसटी) नाशिक कार्यालयाच्या अन्वेषण शाखेने फारूख रहीम खान यास काल अटक केली. संशयित फारुख रहीम खान याने मे. युनायटेड स्टील ट्रेडर्स नावाने बोगस कंपनी सुरू केली.