17.4 C
Latur
Wednesday, January 26, 2022
Homeमहाराष्ट्रशंभरांवर अश्लिल चित्रपटनिर्मिती

शंभरांवर अश्लिल चित्रपटनिर्मिती

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज कुंद्रा हा २०१९ पासून अश्लील चित्रपट बनवण्याचे करत आहे. तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी १०० हून अधिक अश्लील चित्रपटांची निर्मिती केली आहे. गुन्हे शाखेच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कुंद्रांनी या उद्योगामधून कोट्यवधी रुपये कमावल्याचेही पोलिस सूत्रांनी सांगितले. ज्या ऍपच्या माध्यमातून हे अश्लील चित्रपट अपलोड करुन प्रसारित करण्यात येत होते, त्या ऍपला २० लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स होते. यामधूनच कुंद्रा यांना कोट्यवधी रुपये मिळायचे, असे गुन्हे शाखेच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान, आज मुंबई जिल्हा न्यायालयाने राज कुंद्रा आणि त्यांचे सहकारी रायन तोरपे यांना २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मुंबई पोलिसांनी आज जिल्हा न्यायालयासमोर कुंद्रा आणि तोरपे यांना हजर केले. त्यावेळी मुंबई पोलिसांनी ७ दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती.

दरम्यान, राज कुंद्रांच्या यस बँक खात्यावरुन युनायटेड बँक ऑफ आफ्रिकेतील खात्यावर किती पैसे वळवण्यात आले यासंदर्भातील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी न्यायालयाने सांगितले. याच तपासासाठी पोलिसांना आता न्यायालयाने ४ दिवसांचा कालावधी दिला असून २८ जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार पोलिसांनी आता हॉटशॉर्ट ऍपबरोबरच राज कुंद्रांच्या मालकीच्या आणखी एका वेबसाईटसंदर्भातील तपास सुरू केला आहे. कुंद्रा यांनी जेएल स्ट्रीम्ससोबत सुरू केलेल्या एका वेबसाईटचा तपास सध्या पोलिसांकडून केला जात आहे.

शिल्पा शेट्टीच्या अडचणी वाढणार
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार शिल्पा शेट्टीने या वेबसाईटसाठी एक जाहिरातही शूट केली होती. पाच महिन्यांपूर्वी शिल्पाने या वेबसाईटसाठी प्रमोशनल व्हिडीओ शूट केलेले. या वेबसाईटवरही अडल्ट कंटेट उपलब्ध असून ही वेबसाईट अद्यापही भारतामधून सुरु असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळेच आता ही जाहिरात आणि या कंपनीशी शिल्पा शेट्टीचा काय संबंध आहे, याबद्दल पोलिसांकडून चौकशी केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिल्पा शेट्टीच्या खात्याची चौकशी!
पॉर्नोग्राफी प्रकरणात शुक्रवारी सकाळपासून अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरात गुन्हे शाखेकडून झाडाझडती सुरू होती. यातच शुक्रवारी गुन्हे शाखेकडून तिचा जबाब नोंदविण्यात आला. या वृत्ताला गुन्हे शाखेचे सहआयुक्त मिलिंद भारांबे यांनी दुजोरा दिला. तसेच तिच्या बँक खात्याचीही लवकरच चौकशी होणार असल्याचे समजते. पॉर्नोग्राफी प्रकरणातील एका कंपनीत शिल्पा शेट्टीचीही भागीदारी होती. मात्र, २०२० मध्ये तिने या पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली आहे.

भाविकांच्या मिनीबसला आयसरची धडक; ४ ठार, ३ गंभीर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या