28.2 C
Latur
Monday, March 8, 2021
Home क्राइम पतीने केला झोपेत पत्नीचा खून; आईच्या कुशीत झोपलेली चिमुकली जखमी

पतीने केला झोपेत पत्नीचा खून; आईच्या कुशीत झोपलेली चिमुकली जखमी

एकमत ऑनलाईन

नाशिक  : नाशिक तालुक्यातील जाखोरी गावात पत्नी पळून जाणार असल्याच्या संशयाने शनिवारी रात्री पत्नी झोपेत असतांना पतीने गळ्यावर कोयत्याने वार करुन तिचा खून केल्याची घटना समोर आली आहे. आईच्या कुशीत झोपलेल्या मुलीच्या हातावरही कोयत्याची जखम झाल्याने तिला बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी पतीला अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. ज्योती उर्फ मिना (२७) असे मृताचे नाव आहे. शिवाजी तुकाराम माळी (३०, रा. जाखोरी, ता.नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे.

पोलिसांंच्या माहितीनुसार, जाखोरी गावातील शिवाजी तुकाराम माळी याने शनिवारी (दि.१३) रात्री १० वाजेदरम्यान झोपेत पत्नी ज्योती उर्फ मिना हिच्या गळ्यावर कोयत्याने वार केले. दरम्यान सहा वर्षाची मुलगी आईच्या कुशीत झोपलेली असताना तिच्याही हाताला मोठी दुखापत झाली असून तिच्यावर बिटको रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उपायुक्त विजय खरात, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक नखाते, वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुरज बिजली, उपनिरिक्षक एस.एस.भालेराव आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पंचनामा झाल्यानंतर मृृृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. दरम्यान, शिवाजी यास पोलीसांनी अटक केल्यानंतर पत्नी पळून जाणार असल्याने माझ्या मनात राग आल्याने असे कृत्य केल्याचे त्यानेे सांगितले.

Read More  करोनाची भीती वाटते, पण…प्यायला पाणी नाही; हात कुठून धुवायचे?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,442FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या