Sunday, September 24, 2023

मी श्रद्धांविरोधात असलेला ‘नास्तिक’ : प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर

मुंबई – करोना विषाणूचे संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. या प्राणघातक विषाणूची चैन तोडण्यासाठी सरकारने लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यातच बॉलिवूडचे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर कायम त्यांच्या बेधडक आणि स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असतात.

अनेकवेळा त्यांना ट्रोलिंगचाही सामना करावा लागला आहे. मात्र तरीदेखील ते त्यांची मतं निर्भीडपणे मांडत असतात. त्यातच मी सगळ्याच श्रद्धांविरोधात असलेला नास्तिक आहे, असं म्हणत त्यांनी एक ट्विट केलं आहे. त्यांचं हे ट्विट पाहून पुन्हा एकदा नेटकऱ्यांमध्ये त्यांची चर्चा रंगली आहे.

काही दिवसापूर्वी जावेद अख्तर यांनी लाउडस्पीकरवर अजान लावण्यावर आक्षेप घेतला होता. लाउडस्पीकरवर अजान लावल्यामुळे अन्य लोकांना त्रास होतो, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी त्यांना ट्रोल केलं होतं. त्यानंतर आता जावेद अख्तर यांनी नवीन ट्विट करुन मी सगळ्याच श्रद्धांविरोधात असलेला नास्तिक आहे, असं म्हटलं आहे.

Read More  प्रीतीचा खेळ संपला : फेसबुकवरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून ती सहज त्याला जाळ्यात ओढायची

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या