36.1 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeमहाराष्ट्रमी भरपूर खाज असलेला खासदार - उदयनराजेंची चौफेर फटकेबाजी

मी भरपूर खाज असलेला खासदार – उदयनराजेंची चौफेर फटकेबाजी

एकमत ऑनलाईन

सातारा : राष्ट्रवादी आणि काँग्रेस सरकारच्या काळात साता-याच्या मेडिकल कॉलेजसह अनेक काम श्रेयवादामुळे रखडले असल्याचा गौप्यस्फोट भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे. तसंच, शरद पवारांना विनंती करून देखील कोणतेही लोकप्रतिनिधी ग्रेड सेपरेटरच्या भूमिपूजनावेळी आपल्या संकुचित विचार आणि नाकर्त्यापणामुळे आले नाही म्हणून उद्घाटन उरकले, असेही उदयनराजेंनी ठणकावून सांगितले. साता-यात काही दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले यांनी ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन केले होते. त्यावरून बराच वाद पेटला होता. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत असताना उदयनराजे यांनी चौफेर तोफ डागली.

राज्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेस काँग्रेस पक्षाचे सरकार होते त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते. त्यावेळी श्रेय वादामुळे मेडिकल कॉलेज रखडले. फडणवीस सरकारच्या काळात मेडिकल कॉलेजला मंजुरी मिळाली आणि चालना मिळाली. ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन करण्यासाठी राज्य आणि केंद्रीय मंत्रिमंडळ यांना बोलावे होते. पण कोरोनामुळे कुणीच यायला तयार नव्हते. ग्रेड सेपरेटरच्या भूमिपूजनावेळी सर्व लोकप्रतिनिधींना शरद पवारांना विनंती करून सुद्धा संकुचित विचार किंवा नाकर्तेपणामुळे कोणीही आले नाही, असा आरोप उदयनराजेंनी केला.

असे कुठे कायद्यात म्हटल आहे का मंत्री असेल तरच उद्घाटन करायचे. मी सुद्धा खासदार आहे आणि असा तसा नाही भरपूर खाज असलेला खासदार आहे. ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन करताना लोकांचा कौल घेतला आणि शटर उघडल , अशी टोलेबाजीही उदयनराजेंनी केली.

लातूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस विचारसरणीच्या उमेदवारांचा विजय

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
167FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या