23.2 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeमहाराष्ट्रमी शिवरायांचा वंशज नाही : चंद्रकांत पाटील

मी शिवरायांचा वंशज नाही : चंद्रकांत पाटील

एकमत ऑनलाईन

कोल्हापूर : संभाजीराजे छत्रपती आणि आमचा विषय आहे, भाजपने त्यामध्ये चोमडेपणा करू नये, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज कोल्हापूरमधून कोल्हापूरच्याच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला होता. या टीकेला आता चंद्रकांत पाटील यांनी पलटवार करत प्रत्युत्तर दिले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करून प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, मी शिवाजी महाराजांचा वंशज नाही, हे सामान्य ज्ञान आहे. पण हिंदुत्वविरोध्यांसोबत चाललेल्यांना शिवरायांची मक्तेदारी कुणी दिली? तुम्ही शब्दांचे पक्के आणि बाकीचे सगळेच खोटारडे, यावर शेंबडं पोर तरी विश्वास ठेवेल? आणि हो… सगळीकडे ढवळाढवळ करण्याचा अधिकार विश्वप्रवक्त्यांना कुणी दिला?

शिवसेना खासदार संजय राऊत आज शिवसंपर्क अभियानासाठी कोल्हापूर दौ-यावर आहेत. त्यांनी पत्रकार परिषदेत शिवसेनेवर होत असलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना भाजपचा चांगलाच समाचार घेतला. त्याचबरोबर संभाजीराजे यांनाही टोला लगावला होता.

आमच्यासाठी संभाजीराजेंच्या उमेदवारीचा विषय संपल्याचे राऊत म्हणाले. संजय राऊत यांनी राजेंच्या उमेदवारीवरून होत असलेल्या टीकेवरून भाजपला चांगलेच फटकारले. ते म्हणाले की, या राज्यात विरोधी पक्ष आहे पण तो विरोधासाठी विरोध करताना दिसत आहे. एखादा निर्णय घेतला की त्यावर टीका करायची हे त्यांनी ठरवलं आहे. यातून त्यांना कोणता असुरी आनंद मिळतो काय माहीत नाही, पण त्याची पर्वा न करता महाविकास आघाडी ठामपणे पुढे चालली आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जाते.

संजय राऊतांचा संभाजीराजेंना टोला
राजेंनाही संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे कुणाच्या मालकीचे नाहीत. महाराज संपूर्ण विश्वाचे आहेत. ४२ मतांचा प्रश्न होता, राजकारण करत असताना कोणत्या ना कोणत्या पक्षाचा हात धरावा लागतो. यापूर्वी पक्षप्रवेश केलेला नाही का? अशी विचारणा करत आम्हाला तोंड उघडायला भाग पाडू नका, असे राऊत म्हणाले. संभाजीराजे यांनी काल मन मोकळं केलं, आता आमच्यासाठी हा विषय संपल्याचे ते म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या