23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रशरद पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्याची माझी लायकी नाही : अजित पवार

शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्याची माझी लायकी नाही : अजित पवार

एकमत ऑनलाईन

मुंबई : एकनाथ शिंदेच्या बंडानंतर राज्यात सुरु झालेले सत्तातराचे वादळ काही केल्या थंडावताना दिसत नाहीये. दुसरीकडे एकनाथ शिंदेना भाजपचा पाठिंबा आहे का? या प्रश्नावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यामागे भाजपचा एखादा मोठा नेता अद्याप तरी दिसून येत नसल्याचे विधान काल केले होते.

त्यावर अजित पवारांना राज्यातील स्थिती माहिती आहे. परंतु, आसाम आणि गुवाहटी येथील स्थिती माहिती नाही असे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पत्रकार परिषदेत केले होते. दरम्यान, शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्याची माझी लायकी नाही असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या