27.7 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्रमी सामना वाचत नाही : अमृता फडणवीस

मी सामना वाचत नाही : अमृता फडणवीस

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात नाट्यमय घडामोडींनंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार स्थापन झालं. तेव्हापासून शिवसेना सातत्याने फडणवीस आणि शिंदेंवर टीका करत आहे. सामनातून, माध्यमांशी बोलताना विविध माध्यमांतून ही टीका केली जात आहे. या सगळ्या टीकेला आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.

संजय राऊत सध्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडी कोठडीत आहेत. त्यामुळे सामनाची जबाबदारी आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आहे. सामनातून भाजपा आणि शिंदे सरकारवर सडकून टीका करत असतात. त्याविषयी अमृता फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने अमृता फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला.

सामनातून होणाऱ्या टीकेबद्दल विचारलं असता अमृता फडणवीस म्हणाल्या की, मी सामना वाचत नाही, मला त्याबाबत काही माहित नाही. सामनाचे वेगळे विचार आहेत. त्यामुळे त्यांच्यापेक्षा लोकप्रतिनिधींचे विचार मला अधिक महत्त्वाचे वाटतात. सामनावरच्या टीकेप्रमाणेच त्यांनी खातेवाटपावरही भाष्य केलं आहे. शिंदे फडणवीस सरकारने आता अधिक ताकदीनं आणि जोमाने राज्यकारभार करायला पाहिजे, अशी अपेक्षा फडणवीसांनी व्यक्त केली आहे. तसंच पायाभूत सुविधा आणि प्रोजेक्ट्सवर भर देऊन नव्या सरकारने डबल मेहनतीने काम करणं आवश्यक असल्याचं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या