21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमहाराष्ट्रमंत्रिपदासाठी माझी पात्रता वाटत नसेल

मंत्रिपदासाठी माझी पात्रता वाटत नसेल

एकमत ऑनलाईन

मुंबई : चाळीस दिवसानंतर राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. यात तब्बल १८ मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र यामध्ये कुठेही भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे नाव आले नाही. त्यानंतर पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू होत्या. मात्र आज पंकजा मुंडे यांनी महादेव जानकर यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. या रक्षाबंधनानंतर त्यांच्याशी बातचीत करताना त्यांनी त्यांची नाराजी उघडपणे जाहीर केली. वरीष्ठ नेत्यांना माझी पात्रता वाटत नसेल म्हणून मला मंत्रीपद दिले नसेल असा थेट टोला त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना लगावला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातला राजकारण तापण्याची शक्यता आहे. तसेच पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते ृही आक्रमक होण्याची दाट शक्यता आहे.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, ज्यावेळेस मंत्रिमंडळ बनत असते त्यावेळेस सर्वांना समाधानी करणे शक्य नसते. त्यामुळे जे मंत्री झाले त्यांनी तरी लोकांना समाधानी करावे अशा शुभेच्छा मी नव्या मंत्र्यांना देऊन झालेली आहेत.

तसेच मी चर्चेत राहणारच नाव आहे, मात्र अजून त्यांना माझी पात्रता वाटत नसेल, त्यामुळे मला मंत्रीपद दिले नसेल, जेव्हा त्यांना माझी पात्रता वाटेल तेव्हा देतीलही कदाचित, त्याबद्दल मला काही अपेक्षा पण नाही, या चर्चा मीडियातून होतात आणि कार्यकर्त्यातून होतात अशी प्रतिक्रिया यावेळी पंकजा मुंडे यांनी मंत्रीपदावरती दिलेली आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या