18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeमहाराष्ट्रघरात मांजर पाळायचे तर पालिकेची परवानगी घेणे बंधनकारक

घरात मांजर पाळायचे तर पालिकेची परवानगी घेणे बंधनकारक

एकमत ऑनलाईन

पुणे : पुणे तिथे काय उणे हे आपण कायम ऐकतो. पुणेकर कधी काय करतील याचाही काही नेम नाही. कोणत्या ना कोणत्या कारणासाठी पुण्याची नेहमीच चर्चा होत असते. पुणेकरांचे तिरकसं बोलणे आणि पुणेकरांचा मदत करण्याचा स्वभाव या कोणत्या ना कोणत्या कारणाने पुणे नेहमीच चर्चेत असते. आज पुन्हा चर्चेत आले ते घरात मांजर पाळण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या परवान्यामुळे… पुण्यात जर घरात मांजर पाळायचे असेल तर आता त्यासाठी पुणे महापालिकेचा परवाना घ्यावा लागणार आहे.

घरात मांजर पाळायचे असेल तर आता त्यासाठी पुणे महापालिकेचा परवाना घ्यावा लागणार आहे. आरोग्य विभागाच्या या प्रस्तावास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. पुढील आठ दिवसांत परवान्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया राबविली जाणार आहे. महापालिका कायद्यातील तरतुदीनुसार मांजर, कुत्रा, घोडे अशा पाळीव प्राण्यांना घरी ठेवण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे नोंदणी करून त्यासाठी रितसर परवानगी घेणे बंधनकारक आहे.

मांजरासाठी ५० रुपये शुल्क
मांजराची नोंदणी करण्यासाठी वर्षाला ५० रुपये इतके शुल्क भरावे लागणार आहे. तसेच रहिवासी पुरावा, लसीकरण प्रमाणपत्र आणि मांजराचा फोटो ही कागदपत्रे बंधनकारक असणार आहेत. तसेच दरवर्षी त्या परवान्याचे नूतनीकरण करून ५० रुपये परवाना शुल्कशिवाय अतिरिक्त २५ रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या