23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमहाराष्ट्रमी चुकीचं काम केलेले नाही : संजय राऊत

मी चुकीचं काम केलेले नाही : संजय राऊत

एकमत ऑनलाईन

मुंबई : मी पळपुटा नाही. माझा देशातील केंद्रीय संस्था आणि ईडीवर विश्वास आहे. त्यामुळे ईडीच्या चौकशीला सामोर जाण्याची हिम्मत आहे. राज्याचा खासदार, नागरिक म्हणून या संस्थाना सहकार्य करणं हे माझं कर्तव्य आहे, असं प्रतिपादन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. आज ईडीकडून त्यांची चौकशी होत आहे. दरम्यान, चौकशीली जाण्याआधी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

खासदार राऊत म्हणाले की, मी निर्भय आणि निडर असल्याने बेधडकपणे ईडीच्या कारवाईला समोर जाणार आहे. मी कधीच चुकीचे काम केलेले नाही त्यामुळे घाबरण्याचे काही कारण नाही. मी बेडरपणे चौकशीला सामोरा जात आहे असेही राऊतांनी स्पष्ट केलं आहे. राऊत यांची आज ईडीकडून पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी चौकशी होणार आहे. यावेळी ईडी कार्यालयासमोर राऊतांनी शक्तीप्रदर्शन केले आहे.

संजय राऊत यांना ईडीने समन्स बजावले होते. त्यानुसार त्यांना २८ जूनला चौकशीसाठी हजर राहाण्याचे आदेश ईडीकडून देण्यात आले होते. प्रवीण राऊत आणि पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना ईडीने समन्स बजावले आहे. यापूर्वी ईडीने त्यांच्या काही मालमत्ता जप्त केल्या होत्या. अलिबागमधील आपल्या आयोजित सभेमुळे संजय राऊत मागील चौकशीला हजर राहू शकले नव्हते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या