24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeमहाराष्ट्रमी जगलो माझे जगणे...; मृत्यूशय्येवर असताना 'त्यांनी' तरुणासाठी बेड नाकारला!

मी जगलो माझे जगणे…; मृत्यूशय्येवर असताना ‘त्यांनी’ तरुणासाठी बेड नाकारला!

एकमत ऑनलाईन

नागपूर : म्हणतात ना… स्वत:साठी जगला तो काय जगला, दुस-यासाठी जगला तो चिरंजीव झाला. नियतीच्या आलेखात त्याच्या अमरत्वाची नोंद झाली. असाच प्रसंग नागपुरात काल-परवा अनुभवास आला. स्वत: मृत्यूशय्येवर असतानाही दुस-याच्या जगण्याची चिंता असणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक नारायणराव दाभाडकर यांनी आपला बेड तरुणासाठी रिकामा केला आणि दुस-याच दिवशी गतप्राण झाले.

८५ वर्षीय दाभाडकर यांना कोरोना संक्रमण झाले. ऑक्सिजन धोक्याच्या पातळीवर ५५ पर्यंत उतरले होते. अशात हॉस्पिटल आणि बेड मिळणे कठीण झाले होते. शिवाय, घरातील सगळीच मंडळी संक्रमित असल्याने अडथळ्यांचा पहाड होताच. अखेर २२ एप्रिल रोजी संध्याकाळी गांधीनगर येथील मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयात त्यांना बेड मिळाला. अ‍ॅम्ब्युलन्समधून नारायणराव हॉस्पिटलला गेले. एक्स-रे काढल्यावर संक्रमण धोक्याच्या पातळीवर असल्याचे स्पष्ट झाले.

अशा स्थितीत उपचार सुरू झाले आणि खिडकीजवळचा बेड त्यांना मिळाला. बेडवर येत नाही तोच, त्यांना खिडकीच्या बाहेर एक महिला स्वत:च्या नव-याला बेड मिळावा व प्राण वाचविण्यासाठी धडपड करीत असल्याचे त्यांच्या नजरेत पडले. काही क्षण विचार केला आणि लागलीच जावयांना बोलावले. माझे वय ८५, माझ्या मागच्या सगळ्याच जबाबदा-या पूर्ण झाल्या आणि मी माझे जगणे जगलो आहे. आता जगण्याची गरज त्या पेशंटला आहे. तेव्हा हा बेड रिकामा करतो आणि घरी जाऊ या… असे ते उच्चारले. घरी फोन केला तर सगळेच अचंबितही झाले.

डॉक्टरांपुढे नारायणरावांची ही भावना व्यक्त केली तेव्हा डॉक्टरांनी रुग्णाला वा-यावर सोडू शकत नाही, असे स्पष्ट केले. मात्र, नारायणराव ऐकायला तयार नव्हते आणि मी बेड रिकामा करीत असल्याचे लिहून देत असल्याची घोषणा केली आणि लिहूनही दिले. डमिट झाल्याच्या अवघ्या दोन तासात नारायणरावांनी बेड रिकामा केला. घरी परतले. दुस-या दिवशी २३ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता त्यांनी प्राण सोडला. एखाद्या सिनेमातील साजेसा हा प्रसंग प्रत्यक्षात दाभाडकर कुटुंबात घडला.

राज्यात आज ६६,३५८ नवे रुग्णांची भर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या