25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeमहाराष्ट्रमी आतापर्यंत शांत होतो : राठोड संतापले

मी आतापर्यंत शांत होतो : राठोड संतापले

एकमत ऑनलाईन

मुंबई : संजय राठोड यांच्या मंत्रिपदाला भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी जाहीरपणे संजय विरोध केला असून पूजा चव्हाणच्या मृत्यूला कारणीभूत असणा-या राठोड यांना पुन्हा मंत्रीपद दिले जाणे हे अत्यंत दुदैवी असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, चित्रा वाघ यांच्या टीकेला संजय राठोड यांनी उत्तर दिले आहे. ‘लोकशाहीत सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे.

पोलिसांनी निष्पक्ष चौकशी केली आहे. न्यायव्यवस्थेवर आणि पोलिसांवर विश्वास असल्याने मी आतापर्यंत शांत होतो. माझाही परिवार आहे . एखाद्याला किती त्रास होतो याचा आपणही विचार केला पाहिजे. मी आतापर्यंत मी शांत होतो, पण असेच सुरु राहिले तर मी कायदेशीर मार्ग अवलंबणार, नोटीसही देणार,’ असा इशारा संजय राठोड यांनी यावेळी दिला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या